मुंबई : मध्य रेल्वेकडून (Central Railway) मध्य रेल्वेच्या मध्य आणि हार्बर मार्गावर रविवार (15 ऑक्टोबर) रोजी मेगाब्लॉक (Megablock) घेण्यात येणार आहे. अभियांत्रिकी आणि देखभालीची कामांसाठी पाचव्या आणि सहाव्या मार्गांसाठी उपनगरीय विभागात हा मेगाब्लॉक घेण्यात येईल. या ब्लॉक कालावधीमध्ये  रेल्वे मार्गावर धावणाऱ्या अप आणि डाउन मेल एक्स्प्रेस गाड्या अप आणि डाउन जलद मार्गावर वळवल्या जाणार आहेत. त्यामुळे या गाड्या गंतव्यस्थानकावर 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहचतील. 


तर हार्बर मार्गावर देखील मध्य रेल्वेकडून मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते सायंकाळी 4.10 पर्यंत हा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तर या ब्लॉक कालावधीमध्ये पनवेल ते कुर्ला दरम्यान विशेष लोकल चालवल्या जाणार आहेत. त्यामुळे ब्लॉक कालावधीमध्ये रेल्वेचं वेळापत्रक पाहूनच बाहेर पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 


मध्य रेल्ववर मेगाब्लॉक


ठाणे ते कल्याण दरम्यान पाचव्या आणि सहाव्या मार्गावर मध्यरात्री 01.00 ते 4.00 वाजेपर्यंत अप आणि डाऊन मेल आणि एक्सप्रेस गाड्या वळवण्यात येतील. या गाड्या अप आणि डाऊन जलद मार्गावर वळवल्या जातील. तसेच या गाड्या त्यांच्या नियोजित स्थानकावर 10 ते 15 मिनिटे उशीरा पोहचतील. त्यामुळे या ब्लॉकचा परिणाम या मार्गावरुन धावणाऱ्या मेल आणि एक्सप्रेस गाड्यांवर होणार असल्याचं रेल्वेकडून सांगण्यात आलं आहे. 


हार्बर मार्गावर ब्लॉक


छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते पनवेल या मार्गावर सकाळी 11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या कालावधीमध्ये हार्बर मार्गावरील लोकल सेवा रद्द करण्यात आली आहे.  तसेच या कालावधीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून सकाळी 10.48 ते सायांकाळी  4.43 वाजेपर्यंत वांद्रे, गोरेगावपर्यंतची लोकलसेवा रद्द करण्यात आली आहे. 


तर पनवेल ते  छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणारी अप हार्बर मार्गावरील सेवा ही सकाळी  11.16 ते सायंकाळी 4.47 वाजेपर्यंत रद्द करण्यात आली आहे. तसेच वांद्रे आणि गोरेगाव येथून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणारी लोकलसेवा ही 10.48 ते सायांकाळी  4.43 वाजेपर्यंत रद्द केली गेली आहे. या ब्लॉक कालावधीमध्ये  पनवेल ते कुर्ला प्लॅटफॉर्म क्रमांक 8 वरुन विशेष लोकल चालवण्यात येतील. तसेच  हार्बर मार्गावरील प्रवाशांना ब्लॉक कालावधीत म्हणजे सकाळी 10.00 ते सायंकाळी 6.00 वाजेपर्यंत मेन लाइन आणि पश्चिम रेल्वेवरुन प्रवास करण्याची मुभा असणार आहे. 


हेही वाचा : 


Mumbai Airport : मुंबई विमानतळावर 5.68 कोटी रुपयांचे अंमली पदार्थ जप्त, तीन विदेशी महिलांना अटक