एक्स्प्लोर
Advertisement
Mumbai Local : मुंबईत रेल्वेच्या तीनही मार्गांवर आज मेगाब्लॉक
मेगाब्लॉकच्या काळात काही लोकल रद्द असतील.
मुंबई : मुंबईत उपनगरीय रेल्वे मार्गांवर मध्य रेल्वे, हार्बर रेल्वे आणि पश्चिम रेल्वेमार्गावर आज विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण-ठाणे अप फास्ट मार्गावर, हार्बर मार्गावर पनवेल-वाशी आणि नेरुळ-बेलापूर/खारकोपर अप आणि डाऊन मार्गावर, तर पश्चिम रेल्वेवर मरिन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे.
मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर कल्याण ते ठाणे स्थानकांदरम्यान अप फास्ट लाईनवर सकाळी 11.20 ते दुपारी 3.50 या वेळात मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात अप फास्ट मार्गावरील वाहतूक अप स्लो मार्गावर वळवण्यात येणार आहे. त्यामुळे मध्य रेल्वेची वाहतूक काहीशी उशिराने धावेल. तसंच काही लोकल रद्दही करण्यात आल्या आहे.
हार्बर रेल्वेमार्गावर पनवेल-वाशी अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.20 वाजल्यापासून दुपारी 3.50 वाजेपर्यंत, तर नेरुळ/बेलापूर ते खारकोपर मार्गावर अप आणि डाऊन मार्गावर सकाळी 11.30 वाजल्यापासून दुपारी 4 वाजेपर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे मेगाब्लॉकच्या काळात या स्थानकांदरम्यानची वाहतूक पूर्णपणे बंद असेल.Mega Block on 14.7.2019 Kalyan-Thane Up fast line from 11.20 am to 3.50 pm; Panvel-Vashi Up & Dn harbour lines and Nerul/Belapur-Kharkopar Up & Dn harbour lines from 11.30 am to 4.00 pm pic.twitter.com/OxgIxEKLQ9
— Central Railway (@Central_Railway) July 13, 2019
पश्चिम रेल्वे मार्गावर मरीन लाईन्स ते माहीम स्थानकांदरम्यान डाऊन स्लो मार्गावर सकाळी 10.35 वाजल्यापासून दुपारी 15.35 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असेल. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक डाऊन फास्ट मार्गावर वळवण्यात येणार आहे. मेगाब्लॉकच्या काळात काही लोकल रद्द असतील.A jumbo block will be taken from 10.35 hrs to 15.35 hrs on Sunday,14th July, 2019 on Down slow lines between Marine Lines and Mahim stations for maintenance of track, signaling and overhead equipment. #WRUpdates pic.twitter.com/ptJKr1dBnB
— Western Railway (@WesternRly) July 12, 2019
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भविष्य
क्रिकेट
सोलापूर
Advertisement