एक्स्प्लोर

मुंबई लोकल : मध्य, पश्चिम आणि हार्बर मार्गावर आज मेगाब्लॉक

मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील.

मुंबई : मुंबईतील तीनही उपनगरीय रेल्वे मार्गांवर आज (रविवार) मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. ट्रॅक आणि ओव्हरहेडच्या दुरुस्तीसह देखभालीच्या कामासाठी हा मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेवर सकाळी 9 ते सायंकाळी 6 पर्यंत तर हार्बरवर सकाळी 11.40 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वेवर पालघर येथे नवीन पुलासाठी स. 10.15 ते दुपारी 1 पर्यंत ब्लॉक घेतला जाणार आहे. मेगाब्लॉक दरम्यान बहुतांश लोकल गाड्या आपल्या निर्धारित वेळेपेक्षा उशिराने धावतील. मध्य रेल्वे
  • मध्य रेल्वेवर ठाणे आणि दिवा स्थानकादरम्यान अप धिम्या मार्गावर स. 9 ते सायं. 6 पर्यंत ब्लॉक घेणार आहे. तर मुंब्रा ते कळवा स्थानकादरम्यान नवीन पाचव्या आणि सहाव्या अप धीम्या मार्गासाठी मेगाब्लॉक घेतला जाणार आहे.
  • दिवा स्थानकातून निघणाऱ्या अप धीम्या/अर्धजलद लोकल स. 9.07 ते सायं. 6.02 पर्यंत दिवा ते मुलुंड स्थानकापर्यंत अप जलद मार्गावर चालवल्या जातील. मध्य रेल्वेवर स. 8 ते सायं. 7 पर्यंत लोकल सेवा सुमारे 10 मिनिटे उशिरा धावतील. या कालावधीत काही लोकल फेऱ्या रद्द करण्यात येतील.
हार्बर रेल्वे
  • हार्बर मार्गावर सीएसएमटी ते चुनाभट्टी-वांद्रेपर्यंत सकाळी 11.40 ते दुपारी 4.10 तर चुनाभट्टी-वांद्रे-सीएसएमटीपर्यंत स. 11.10 ते सायं. 4.40 पर्यंत मेगाब्लॉक असेल.
  • सीएसएमटी-वडाळा ते वाशी-बेलापूर-पनवेलपर्यंत स. 11.34 ते दु. 4.23 पर्यंत आणि सीएसएमटी ते वांद्रे-अंधेरी-गोरेगावपर्यंत स. 9.56 ते दु. 4.16 पर्यंत सेवा खंडित राहतील.
  • पनवेल-बेलापूर-वाशी ते सीएसएमटीपर्यंत स. 9.53 ते दु. 2.44 आणि गोरेगाव-अंधेरी-वांद्रेहून स. 10.45 ते सायं. 4.58 पर्यंत सेवा खंडित राहील. प्रवाशांच्या सुविधेसाठी पनवेल आणि कुर्लामार्गावर विशेष लोकल चालवण्यात येतील.
पश्चिम रेल्वे पश्चिम रेल्वेवर पालघर येथे नवीन पादचारी पुलासाठी गर्डर उभारण्यासाठी रविवारी, स. 10.15 ते दु. 1.00 पर्यंत दोन्ही मार्गांवर ब्लॉक चालणार आहे. त्यामुळे काही फेऱ्या रद्द केल्या जातील.

महत्त्वाच्या बातम्या

Rain Update School Holiday :  हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
हवामान विभागाचा मुसळधार पावसाचा इशारा, नवी मुंबई, ठाणे, भिवंडी आणि पालघरमध्ये शाळांना 4 जुलैला सुट्टी जाहीर 
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
मुंबईत महानायकांच्या घरात शिरलं पावसाचं पाणी, पण नेत्यांपासून नटांपर्यंत सगळेच गप्प, रोहित पवारांचा टोला  
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916

व्हिडीओ

Ashwini Bhide Special Report : अश्विनी भिंडेंना शिवसेनेकडून टार्गेट, भाजप-ठाकरे गटाचा एकच सूर
Zero Hour : मुंबईच्या मॅनहोल अपघातावरून थेट महापालिका आयुक्तांचा राजीनामा मागणं योग्य वाटतं का?
Sanjay Raut Mumbai : तुमची लायकी शिव्या खायची, लोकांनी यांना चपला माराव्यात, संजय राऊतांचा हल्लाबोल
Operation Tiger Special Report : सचिन आलाय आता टीमही येईल, कडूंच्या वक्तव्याचा भाजपला राग
Zero Hour Full : पावसाळ्यात उघड्या मॅनहोल्समुळे दुर्घटना घडली तर कोणावर गुन्हे दाखल व्हायला हवे?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
RBI : आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
आरबीआयचा बँक ऑफ बडोदाला 63.60 लाखांचा दंड, रिझर्व्ह बँकेनं कारवाई कशामुळं केली? दोन कारणं समोर
Tukaram Mundhe: मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
मी थेट त्यांचे लायसन्स रद्द करणार, तुकाराम मुंढेंचा हॉटेलवाल्यांना पुन्हा इशारा; म्हणाले, 'मला फक्त सर्टिफिकेट नकोय..'
EPFO : पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
पीएफ खातेदारांसाठी गुड न्यूज, तीन दिवसांमध्ये पैसे खात्यात येणार, ऑटो सेटलमेंटच्या मर्यादेत 5 लाखांपर्यंत वाढ
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
धक्कादायक! मुंबईनंतर मीरा-भाईंदर, अंगावर नारळाचं झाड कोसळलं; माजी उपनराध्यक्षांच्या मुलाचा मृत्यू
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
मुंबईसह 5 जिल्ह्यांना रेड अलर्ट, आपत्ती विभागाकडून नागरिकांना आवाहन; हेल्पलाईन क्रमांक जारी, मुंबईसाठी 1916
Nifty 50 : निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
निफ्टी 50 ने 2 महिन्यांचा उच्चांक गाठला, आयटी आणि रिअल्टी शेअर्सच्या वाढीसह सलग तिसऱ्या सत्रात वाढ कायम
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 03 जून 2026 | शुक्रवार
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
पावसाचा अलर्ट, केडीएमसीमध्ये शाळांना सुट्टी; पोलादपुर-महाबळेश्वरला जोडणारा आंबेनळी घाट चार दिवस बंद
Embed widget