एक्स्प्लोर

Mumbai Local Mega Block : महाराष्ट्र भूषण पुरस्कारासाठी रविवारी हार्बर मार्गावरील मेगा ब्लॉक रद्द; मात्र मेन लाईनवर माटुंगा-मुलुंड मार्गावर मेगा ब्लॉक वेळापत्रकाप्रमाणे

Mumbai Local Mega Block : रविवारी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block) रद्द करण्यात आला आहे.

Mumbai Local Mega Block : रविवारी म्हणजे उद्या (16 एप्रिल) महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळा संपन्न होणार आहे. या दिवशी हार्बर रेल्वे मार्गावर होणारा मेगा ब्लॉक (Harbour Line Mega Block) रद्द करण्यात आला आहे. हार्बर मार्गावर मेगा ब्लॉक असणार नाही. मात्र, मेनलाईन वर माटुंगा-मुलुंड जलद मार्गावर अगोदर जाहीर केल्याप्रमाणे मेगा ब्लॉक राहणार आहे. सर्वच राजकीय पक्षांनी मेगाब्लॉक रद्द करण्याची मागणी केली होती. सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार (Minister Sudhir Mungantiwar) यांनी देखील मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने हार्बर मार्गावरचा मेगा ब्लॉक रद्द केला आहे. 

केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा यांच्या हस्ते पुरस्काराचे वितरण

रविवारी (16 एप्रिल) डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी (Appasaheb Dharmadhikari) यांचा महाराष्ट्र भूषण (Maharashtra Bhushan) पुरस्कार देऊन सन्मान करण्यात येणार आहे. हा पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री अमित शाहा (Minister Amit Shah) यांच्या हस्ते देण्यात येणार आहे. या कार्यक्रमासाठी विविध मार्गाने खारघर येथे लाखोंच्या संख्येने भाविक येणार आहेत. त्याचवेळी हार्बर रेल्वेवर नियमित देखभालीच्या कामांसाठी मेगा ब्लॉक घेण्यात आला होता. मात्र, स्वतः सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी मध्य रेल्वेच्या विभागीय व्यवस्थापकांशी चर्चा केल्यानंतर रविवारी होणारा हार्बर मार्गावरचा मेगाब्लॉक मध्य रेल्वेने रद्द केला आहे. आता महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी येणाऱ्या नागरिकांना हार्बर रेल्वेने व्यवस्थित प्रवास करता येईल. सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या सहकार्याबद्दल मध्य रेल्वेचे आभार मानले आहेत.

Prasad Lad : प्रसाद लाड यांच्यासह राजू पाटील यांनीही केली होती मागणी

भाजप आमदार प्रसाद लाड (Mla Prasad Lad) यांनी देखील हार्बर रेल्वेवरचा मेगा ब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती. याबाबत त्यांनी केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे (Minister Raosaheb Danve) यांना पत्र लिहले होते.  डॉ.अप्पासाहेब धर्माधिकारी यांना महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. पुरस्कार प्रदान समारंभास येणाऱ्या अनुयायींच्या सोयीसाठी रविवारी घेण्यात येणारा मेगा ब्लॉक रद्द करावा अशी मागणी लाड यांनी केली होती. त्याचबरोबर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे आमदार राजू पाटील (Raju Patil) यांनी देखील मेगा ब्लॉक रद्द करण्यात यावा अशी मागणी केली होती.  

महत्त्वाच्या बातम्या:

मुंबईकरांनो, रविवारच्या प्रवासाचं नियोजन आजच करा; उद्या मध्य आणि हार्बर मार्गांवर 'मेगाब्लॉक'

महत्त्वाच्या बातम्या

Vishakha Raut : उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
उद्धव ठाकरेंना बीएमसीत मोठा धक्का, नगरसेविका विशाखा राऊत यांचे कुणबी प्रमाणपत्र रद्द, नगरसेवकपदही धोक्यात
Mumbai Ganeshotsav 2026 Local Train And Metro: गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
गणेशभक्तांसाठी दिलासा! मेट्रोच्या फेऱ्या वाढणार; लोकलवरील मेगाब्लॉकलाही ब्रेक, मंगलप्रभात लोढांचे निर्देश
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Maharashtra Live News Updates: व्यवहारिक मराठी येत नसलेल्या 1 हजार 268 रिक्षा, टॅक्सीचालकांना आरटीओकडून नोटीस
Shivsena Name And Symbol Hearing In Supreme Court: उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!
उद्धव ठाकरे शिवसेना पक्ष आणि चिन्हाची केस जिंकू शकतात का? जिंकल्यास काय होईल?; उल्हास बापट आणि असीम सरोदे यांनी A टू Z सांगितलं!

व्हिडीओ

Laxman Hake Pune : 1 सप्टेंबरला ओबीसींना मुंबईत येण्याचं आवाहन, सरकारने फसवलंय म्हणत हाकेंचा हल्लाबोल!
PM Modi On Gen Z Special Report : जेन झींशी संवाद साधण्यासाठी सरकारची खटपट : ABP Majha
Pocket Money Scheme Special Report : उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थिनींना पॉकेटमनी मिळणार
Vande Mataram Special Report : वंदे मातारमबाबत काँग्रेसचा ठराव, अमित शाहांचा हल्लाबोल
Sinhagad Fort 'किल्ले सिंहगड' ॲप नोंदणी द्वारेच मिळणार गडावर प्रवेश; एआय कॅमेऱ्यांची राहणार करडी नजर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
PM Awas Yojana Beneficiary List 2026 : पीएम आवास योजना ग्रामीण घरकुल यादीमध्ये नाव कसं चेक करायचं? 
Nashik Road Issue : नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, रस्त्यांच्या दर्जाचा प्रश्न ऐरणीवर, पाहा Video
नाशिकमध्ये रस्ता खचला, खडीनं भरलेला डंपर रस्त्यामध्येच अडकला, Video व्हायरल
Tarique Rahman India Visit: बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
बांगलादेशच्या पंतप्रधानांच्या भारत दौऱ्यावरून 'गोंधळ', राष्ट्रपती भवनाने अवघ्या तासाभरातच स्वागत संदेश मागे घेतला!
Tukaram Mundhe: राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
राजकारणात प्रवेश करणार का? FDA आयुक्त तुकाराम मुंढेंच्या एका वाक्यातील उत्तरानं भूवया उंचावल्या!
Sugar Price Hike : साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड दोन कारणं सांगत म्हणाले...
साखरेच्या दरात वाढ कोणत्या कारणांमुळं? माजी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांनी दोन कारणं सांगितली
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
'तुझी बहिण घरी चालणार नाही, पोटगीपोटी दीड कोटी दे..' लव्ह मॅरेज केलेल्या ICICI बँक मॅनेजर बायकोची कोर्टात मागणी; व्यथित SBI अधिकाऱ्याने तीन पिस्तूल खरेदी केल्या अन् अवघ्या 30 मिनिटात संपूर्ण कुटुंब संपवलं
Bhiwandi Crime News: जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
जेवणासाठी थांबला; दोघांनी धमकावून लुटण्याचा प्रयत्न केला, ड्रायव्हरनं प्रतिकार करताना मानेवर सपासप वार केले अन्...भिवंडीत मध्यरात्री 2.45 वाजताचा थरार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
विरोध मोडून काढायला अलीकडे खास अधिकारी जिल्ह्यात पाठवलेत, पण जेल फोडणाऱ्या वसंतदादांचा हा जिल्हा, शक्तिपीठसाठी सरकारचा अतिरेक परतवून लावू; जयंत पाटलांचा सांगली मोर्चात एल्गार
Embed widget