एक्स्प्लोर
हौशी महिला प्रवाशांची कर्जत लोकलमध्येच दहीहंडी

मुंबई : दहीहंडीची सुट्टी नसली, तरी मुंबईतील चाकरमानी मागे राहणारे नाहीत. ऑफिसला जातानाही या सणाचा आनंद घेता यावा म्हणून चक्क लोकलमध्येच काही महिला प्रवाशांनी हंडी बांधली. कर्जत-सीएसटी लोकलनं प्रवास करणाऱ्या महिलांनी ही गोकुळाष्टमी अनोख्या पद्धतीनं साजरी केली. हौशी महिला प्रवाशांनी लोकलमधल्या हँडललाच दहीहंडी बांधली. या हंडीने साऱ्याच प्रवाशांचं लक्ष वेधलं.चार थरांचं बंधन सुप्रीम कोर्टाने घातल्यामुळे महिलांनी ही हंडी थराच्या मर्यादेत राहूनच फोडली. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी एका महिला प्रवाशाने ही दहीहंडी फोडली. सोशल मीडियावरही या अनोख्या दहीहंडीचे फोटो व्हायरल झाले आहेत.
Before You Go
Abhijeet Dipke On Narendra Modi : मोदींची डिग्री खरी असावी.. अभिजीत दिपके थेटच बोलले..






















