मुंबई : मध्य रेल्वेवर ठाणे ते दिवा दरम्यान  येत्या रविवारी (19 डिसेंबर)  पाचव्या आणि सहाव्या मार्गिकांच्या कामासाठी तब्बल 18 तासांचा मेगाब्लॉक घेतला जाणार आहे. या  ब्लॉक दरम्यान 160 लोकल गाड्या  रद्द होणार आहे. सकाळी 8 वाजल्यापासून ते रात्री 2 वाजेपर्यंत  ब्लॉक घेण्यात येणार आहे. 


एम आर व्ही सी घेत असलेल्या रेल्वे ब्लॉकला मंजुरी  देण्यात आली आहे. दिवा ते ठाणे स्थानाकादरम्यान धीम्या मार्गिकेवर  हा ब्लॉक घेण्यात येणार आहे.  मात्र जलद मार्गिकेवर लोकल गाड्या सुरू राहणार आहे. ज्या गाड्या कळवा, मुंब्रा स्थानकांवर थांबणार नाहीत. या ब्लॉकचा लोकल, मेल आणि एक्स्प्रेसच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम होणार  आहे.  18, 19 आणि 20 डिसेंबरला 18 मेल एक्सप्रेस गाड्या रद्द करण्यात आल्या आहे. तर दोन  एक्सप्रेस पुणे स्थानकात  शॉर्ट टर्मिनेट करणार आहे.




18 डिसेंबरला रद्द करण्यात आलेल्या गाड्या 



  • 12112 अमरावती सीएसएमटी

  • 17611 नांदेड सीएसएमटी 

  • 11030 कोल्हापूर सीएसएमटी 


19 डिसेंबरला रद्द करण्यात आलेल्या गाड्या 



  • डेक्कन एक्सप्रेस ( जाणारी आणि येणारी ) 

  • पंचवटी एक्सप्रेस ( जाणारी आणि येणार )

  • जालना जनशताब्दी एक्सप्रेस ( जाणारी आणि येणारी ) 

  • डेक्कन क्वीन एक्सप्रेस ( जाणारी आणि येणारी ) 

  • नंदीग्राम एक्सप्रेस

  •  सीएसएमटी अमरावती एक्सप्रेस

  • सीएसएमटी गडग एक्सप्रेस 

  • सीएसएमटी नांदेड एक्सप्रेस 

  • कोयना एक्सप्रेस 




20 डिसेंबरला रद्द करण्यात आलेल्या गाड्या 



  • आदीलाबाद सीएसएमटी नंदीग्राम एक्सप्रेस 

  • गडग सीएसएमटी एक्सप्रेस


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha




महत्त्वाच्या बातम्या :