मुंबई : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात बोलताना इलेक्ट्रॉनिक वाहनांसंदर्भात महत्वाची माहिती दिली आहे. येत्या दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईकची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या किमती एवढी होईल.  येत्या काळात आम्ही सर्वसामान्य लोकांना पर्यायी इंधन वापरण्याचा पर्याय देत आहोत.  येत्या काळात नवीन गाड्याची किंमत 35 टक्क्यांनी कमी होईल, असंही ते म्हणाले. शिवाय जुन्या गाड्या भंगारात काढल्या तर प्रदूषण कमी होईल. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील, असं देखील गडकरी म्हणाले. रस्ते विकासात गुंतवणुकीच्या संधी या विषयावर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय परिषद पार पडली या कार्यक्रमात ते बोलत होते. 


रस्ते विकासात गुंतवणुकीच्या संधी


गडकरी म्हणाले की, देशात दोन गोष्टीवर फार प्रयत्न करावा लागत नाही एक लोकसंख्या आणि दुसरी ऑटोमोबाईल ग्रोथ, असं नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. रस्ते विकासात गुंतवणुकीच्या संधी या विषयावर नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत राष्ट्रीय परिषदेत ते बोलत होते. दोन वर्षात इलेक्ट्रॉनिक कार आणि बाईकची किंमत पेट्रोल-डिझेलच्या गाड्यांच्या किमती एवढी होईल, असं देखील गडकरी यावेळी म्हणाले.


जर टीव्ही इंस्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही?
या कार्यक्रमात बोलताना नितीन गडकरी म्हणाले की,  1995 ला आम्ही गुंतवणूकदारांकडे जात होतो मात्र आता गुंतवणूकदार आमच्याकडे येत आहेत.  1994 जेव्हा मी नवीन मंत्री झालो होतो तेव्हा माझ्याकडे नवीन टीव्ही माझ्याकडे आला होता.  मी पुण्यात एका दुकानात गेलो होतो आणि दुकानदाराला म्हणालो मला इंस्टॉलमेंट टीव्ही द्या.  त्यावेळी मी सार्वजनिक बांधकाम मंत्री होतो. इंस्टॉलमेंट टीव्ही घेणारा मी कदाचित पहिलाच मंत्री असेन, असं गडकरी म्हणाले. त्यांनी म्हटलं की,  त्या दुकानदाराला समजले तेव्हा तो म्हणाला साहेब मी तुम्हाला नवीन पिस आला की देतो.  पण तो टीव्ही काही मला मिळाला नाही. त्यावेळी मी विचार केला जर टीव्ही इंस्टॉलमेंटवर मिळू शकतो तर रोड का नाही मिळत. त्यावर मी विचार केला आणि पहिला ठाणे-भिवंडी बायपास बनवला, असं गडकरींनी सांगितलं. 


नितीन गडकरी म्हणाले की, वरळी वांद्रे हा प्रोजेक्ट 420 कोटी होता. नंतर तो प्रोजेक्ट साडे आठशे कोटींवर गेला. गुंतवणूकदारांची व्याप्ती आम्ही येत्या काळात वाढवत आहोत. यामुळे अनेक प्रोजेक्टची पूर्तता देखील लवकर होण्यास मदत होईल. आता 12 तासात रस्त्याने मुंबई ते दिल्ली जाता येईल. अगरबत्तीच्या काड्या आधी चीनमधून आयात व्हायच्या. मात्र त्रिपुरातून नागपूरमध्ये अगरबत्तीच्या काड्या आणल्या. ज्यामुळे कॉस्ट खर्चही वाचला. हे फक्त एक उदाहरण आहे असे अनेक प्रकल्प मार्गी लावता येतील, असंही गडकरी म्हणाले. 


इतर महत्वाच्या बातम्या


Nitin Gadkari : देशातील श्रीमंतांच्या यादीत कोल्हापूरकर अव्वल कसे? नितीन गडकरींनी कारण सांगितलं! 

येत्या सहा महिन्यात वाहनांना 'फ्लेक्स फ्यूएल इंजिन' बंधनकारक; केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची माहिती

मिनी मेट्रोचं 'विदर्भ सर्किट'; विदर्भातल्या प्रमुख शहरांना नागपूरशी मिनी मेट्रोनं जोडणार, केंद्रीय मंत्री नितीन गडकरींची घोषणा


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



Car loan Information:

Calculate Car Loan EMI