नवी मुंबई: नवी मुंबईतील पनवेलनजीक कामोठ्यात असलेल्या डॉ बाळासाहेब खडबडे आणि डॉ स्नेहलता खडबडे यांच्या यशोदा हॉस्पिटलला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS)यांच्याकडून फेलोशिप अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. 'वंध्यत्व निवारण' अर्थात Reproductive Medicine या विषयावरील फेलोशिपसाठी (MUHS)यांच्याकडून मान्यता मिळाली आहे.  राज्याचे वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी जी म्हैसकर यांनी देखील डॉ खडबडे यांच्या हॉस्पिटलची दखल घेतली आहे. कामोठ्यातील सेक्टर 21मध्ये डॉ खडबडे यांचं यशोदा मॅटर्निटी अँड आयव्हीएफ सेंटर आहे. 


वैद्यकीय शिक्षण विभागाचे संचालक डॉ. डी जी म्हैसकर यांनी म्हटलं आहे की डॉ खडबडे यांनी त्यांच्या यशोदा हॉस्पिटलच्या माध्यमातून उत्तम काम केलं आहे. अत्याधुनिक सेवा देऊन त्यांनी विश्वसनीयता आणि रुग्णांचा विश्वास प्राप्त केला आहे. याचंच फलित म्हणून आज या फेलोशिप अभ्यासक्रमासाठी त्यांच्या हॉस्पिटलची निवड झाली आहे, असं डॉ. म्हैसकर यांनी म्हटलं आहे.


यशोदा हॉस्पिटलला महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ, नाशिक (MUHS)यांच्याकडून फेलोशिप अभ्यासक्रमासाठी मान्यता मिळाली आहे. 2021-22 या कालावधीसाठी ही फेलोशिप मिळाली आहे. या अभ्यासक्रमासाठी 3 विद्यार्थी या कालावधीत प्रवेश घेऊ शकणार आहेत.


यासंदर्भात बोलताना डॉ. खडबडे म्हणाले की MUHS च्या फेलोशिप अभ्यासक्रमासाठी मान्यता काही निकषांच्या आधारे दिली जाते. ही आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे की MUHS कडून 'वंध्यत्व निवारण' अर्थात Reproductive Medicine या विषयावरील फेलोशिपसाठी आमच्या हॉस्पिटलची निवड केली. ही खरंतर रुग्णसेवेतून मिळालेली एक पोचपावती आहे. यामुळे डॉक्टरांना प्रशिक्षण देण्याची एक नवीन संधी निर्माण झाली आहे. आम्ही या फेलोशिपचा फायदा नक्की लोकांना कसा करून देता येईल यासाठी प्रयत्न करू, असं डॉ. खडबडे यांनी सांगितलं आहे.


इतर महत्वाच्या बातम्या


World IVF Day: आज जागतिक आयव्हीएफ दिन! अपत्य न होणाऱ्या जोडप्यांसाठी वरदान, काय आहे IVF? तज्ञांकडून जाणून घ्या... 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha