मुंबई : शहरातील लालबागमधील वन अविघ्न पार्क इमारतीला भीषण आग लागली. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आला होता. या घटनेत एकाचा मृत्यू झाल्याची माहिती आहे. इमारतीच्या 19व्या मजल्यावर आग लागली होती. पण काही वेळातच ही आग 5व्या मजल्यापर्यंत पसरली. दरम्यान, या घटनेनंतर अनेक धक्कादायक खुलासे झाले आहे. ही इमारत बांधताना नियमांचे उल्लंघन झाले असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच इमारत निर्माणधीन असतानाही काही घटना घडल्या आहेत. तर दुसरीकडे महापालिका अग्निशमन दलाकडेही आग विझवण्यासाठी पुरेशी यंत्रणा नसल्याचे समोर आले आहे.


मुंबईतील लालबाग परिसरात ही वन अविघ्न 60 मजल्यांची गगनचुंबी इमारत आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. अग्नीशमन दलाला लेव्हल तीनचा कॉल देण्यात आलाय. लेव्हल तीनचा कॉल आगीचं स्वरुप भीषण असताना दिला जातो.


वन अविघ्न इमारतीच्या 21व्या मजल्यावरुन एका व्यक्तीनं जीव वाचवण्यासाठी इमारतीच्या गॅलरीतून लटकून जीव वाचवण्याचा प्रयत्न केला. परंतु, हात सुटल्यामुळे ती व्यक्ती इमारतीवरुन खाली पडली. या व्यक्तीला तात्काळ रुग्णालयात दाखल केल्याची माहिती मिळत आहे. या घटनेत ही व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 


अग्नीशमन दलाचे जवान इमारतीत प्रवेश करुन आग विझवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करत आहेत. या इमरातीपर्यंत पोहोचण्यासाठी असलेला रस्ता अगदी चिंचोळा असल्यामुळं अग्नीशमन दलाला अनेक अडथळ्यांचा सामना करावा लागत आहे. पण आगीपर्यंत पोहोचण्यात अग्नीशमन दलाला जिकरीचं होतं आहे. आगीत आतापर्यंत एक व्यक्ती गंभीर जखमी झाल्याची माहिती मिळत आहे. 


मुख्य आराखड्यात छेडछाड..



  •  या इमारतीचं बांधकाम 2006 पासून सुरु झालं. यात 46 कमर्शिअल गाळे आहेत. 

  • मुख्य आराखड्यात छेडछाड करुन चारचा वाढीव एफएसआय घेतला. नियमानुसार 1.33 चा एफएसआय मिळायला हवा होता.

  • माजी महापालिका आयुक्त सीताराम कुंटेनी या प्रकल्पावर आक्षेप घेतला होता. हा बिल्डर स्वत:लाच रिहॅब करत आहे, असा आक्षेप सिताराम कुंटेंनी घेतला.

  • हाय पॉवर कमिटीकडून जादा एफएसआयबाबत आक्षेप घेतला. या प्रकल्पामुळे 46 कमर्शिअल गाळ्यांचं पुनर्वसन झालंच नाही.

  • यानंतर अजॉय मेहता आयुक्त झाले. या काळात प्रकल्पाला गती मिळाली.



अविघ्ना पार्क इमारतीला आतापर्यंत विघ्नांचाच इतिहास 



  • वन अविघ्ना पार्क हा क्लस्टर रिडेव्हलमेंटचा प्रोजेक्ट होता. 2.5 लाख स्केअर फुटाचं हे बांधकाम आहे. अविघ्ना पार्क इमारतीला आतापर्यंत विघ्नांचाच इतिहास असल्याचे समोर आलंय.

  • नीश डेव्हलपर्सचे बिल्डर कैलाश अग्रवाल यांनी ही इमारत 10 वर्षांपूर्वी बांधली. 7-8 वर्षांपूर्वी या इमारतीत लोक रहायला आले.. 

  • 2011 मध्ये इमारतीचे बांधकाम सुरू असताना क्रेन पडली होती. यात बाजूच्या 6 घरांचं क्रेन पडल्यानं नुकसान झालं होतं.

  • महिन्याभरापूर्वी गणेशउत्सवादरम्यान याच इमारतीच्या भागात आग लागली होती. तेव्हा फायर ऑडीट झाले. मात्र, ठोस उपाययोजना झाली नाही. जर त्याचवेळी नीट फायर ऑडीट झाले असते तर आजची दूर्घटना टाळता आली असती.



मुंबईतील फायर ब्रिगेडकडे मोठी लॅडरच नाही



  • मुंबईतील फायर ब्रिगेडकडे 90 मीटरची सर्वात मोठी लॅडर आहे. त्याच्या वर पाण्याचा फ्लो 10 ते 15 मीटर जातो.

  • मुंबईत ज्या उंच इमारती आहेत त्यांच्यापर्यंत जाण्याकरता पुरेश्या उंचीची लॅडर नाही.

  • अग्निशमन दलाची लॅडर 30 फ्लोअरपर्यंत आहे. आणि वन अविघ्ना इमारत 60 मजल्याची आहे. यापेक्षाही उंच इमारती मुंबईत आहेत.