Aaditya Thackeray : पर्यटन आणि परायवरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांनी 2027 पर्यंत बेस्टच्या ताफ्यात सर्व बसेस इलेक्ट्रिक असतील, असं आश्वासन मुंबईकरांना दिलं आहे. राज्याच्या पर्यावरणावर बोलत होते. यावेळी आदित्य ठाकरे म्हणाले की, जगभरात पर्यावरणाच्या बाबतीत राज्य सरकारांमध्ये  सर्वाधिक चांगले काम महाराष्ट्राने केले आहे. प्रदुषणावर नियंत्रण मिळवण्यासाठी राज्य सरकार काम करत आहे, असेही ते म्हणाले.


गेल्या दहा वर्षातील नैसर्गिक आपत्ती ही वातावरणीय बदलामुळे आली आहेत. एनर्जी व ट्रान्सपोर्ट क्षेत्रातील प्रदूषण कमी करावे लागेल. जिथं दुष्काळ होता, तिथं आता अतिवृष्टी होताना दिसतेय.  पश्चिम किनारपट्टीवर कधी वादळे येत नसते, पण वर्षभरात दोन ते तीन वादळे येवून गेली आहेत. ऋतू बदलत आहेत, तसं आपल्यालाही बदलावं लागेल, असं आदित्य ठाकरे म्हणाले.  250 मिमी पाऊस एका दिवसात पडला तर कुठलंही शहर हे सोसू शकणार नाही. मनुष्य स्वत:ला ताकदवान समजतोय. पण डायनासोरही पूर्वी ताकदवान होताच की. पण निसर्गापुढं तोही लूप्त झाला. त्यामुळं डायनासोर व्हायचं नसेल तर बदलायला हवे, असेही आदित्य म्हणाले.


मुंबईत एका वर्षात कचरा दहा हजार टनांवरून साडेसहा हजार टनांवर आला आहे. इलेक्ट्रिक व्हेईकल धोरणामुळं ईव्ही गाड्यांचे प्रमाण राज्यात वाढलं आहे. 2027 पर्यंत बेस्टच्या सर्व बसेस इलेक्ट्रीक असतील, असे यावेळी आदित्य म्हणाले. वर्षाजवळील  वादळात झाड पडल्यानं मुख्यमंत्र्यांना खूप दु:ख झालं. ते कोवीड काळात रोज त्या झाडाकडे पाहत असायचे. त्यामुळं बाळासाहेब ठाकरे स्मारक बनवताना एकही झाड न कापण्याचा निर्णय घेतल्याचं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.


संबधित बातम्या :


मुंबई महापालिकेत आता केंब्रिज बोर्डाच्याही शाळा, महाराष्ट्रातही अशा शाळा सुरु करणार : आदित्य ठाकरे  
नारायण राणे यांनी आदित्य ठाकरे यांच्या मतदारसंघात जाणं टाळलं, वरळी येथील नियोजित सभा रद्द
Electric Vehicle Charging Station : मुंबईत इलेक्ट्रिक वाहन चार्जिंग स्टेशन, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन, कसं आहे हे चार्जिंग स्टेशन