एक्स्प्लोर
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
मोठ्या थाटात वाढदिवस साजरा झाला. पण त्यानंतर आग लागली आणि पाहता पाहता हॉटेलचा सगळा परिसर आगेने कवेत घेतला.
मुंबई : मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 28 वर्षीय खुशबू मेहता या तरुणीचा समावेश आहे.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे खुशबूला वाढदिवशीच मृत्यूने गाठलं. खुशबू मेहताचा 28 डिसेंबर रोजी वाढदिवस होता. त्यानिमित्ताने कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज बिस्त्रो रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये पार्टीचं आयोजन करण्यात आलं होतं.
पार्टीला तिचे मित्र आणि नातेवाईकही उपस्थित होते. मोठ्या थाटात वाढदिवस साजरा झाला. पण त्यानंतर आग लागली आणि पाहता पाहता हॉटेलचा सगळा परिसर आगेने कवेत घेतला. या अग्नितांडवात खुशबूचा मृत्यू झाला. वाढदिवशीच 28 वर्षीय खुशबूचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे.
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
"कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
मृतांची नावं :
प्रमिला
तेजल गांधी (वय वर्षे 36)
खुशबू मेहता (वय वर्षे 28)
विश्वा ललानी (वय वर्षे 23)
पारुल लकडावाला (वय वर्षे 49)
धैर्य ललानी (वय वर्षे 26)
किंजल शहा (वय वर्षे 21)
कविता धरानी (वय वर्षे 36)
शेफाली जोशी
यशा ठक्कर (वय वर्षे 22)
सरबजीत परेला
प्राची खेतानी (वय वर्षे 30)
मनिषा शहा (वय वर्षे 47)
प्रीती राजगीरा (वय वर्षे 41)
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement