एक्स्प्लोर
Advertisement
कमला मिल्स आग : ...आणि 'ती'ची इच्छा अपूर्णच राहिली
ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती.
मुंबई : मुंबईतील लोअर परेलमधील कमला मिल्स कम्पाऊंडमधील भीषण आगीने मुंबईकर हादरले आहेत. गुरुवारी रात्री लागलेल्या या आगीत 14 जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये 22 वर्षीय यशा ठक्कर नावाच्या तरुणीचा समावेश आहे.
नव्या वर्षाच्या स्वागतासाठी यशा गुजरातहून मुंबईला आली होती. थर्टी फर्स्ट डिसेंबरसाठी तिची तयारी होती. ती पहिल्यांदाच नव्या वर्षाचं स्वागत मुंबईत करणार होती. त्यामुळे ती फारच उत्साहात होती.
मुंबईत कमला मिल्स कम्पाऊंडमध्ये भीषण आग, 14 जणांचा मृत्यू
यशा गुरुवारी (28 डिसेंबर) रात्री चुलत भाऊ आणि बहिणीसोबत कमला मिल्स कम्पाऊंडमधील हॉटेल मोजोज रेस्टॉरंट अॅण्ड पबमध्ये जेवायला गेले होती. पण त्यानंतर तिथे आग लागली आणि पाहता पाहता आग हॉटेलमध्ये पसरली.
आग लागल्यानंतर चुलत बहिणी जीव वाचवण्यासाठी वॉशरुममध्ये गेल्याने ती बचावली. पण यशा आगीच्या कचाट्यात सापडली आणि तिचा दुर्दैवी मृत्यू झाला. यशाचे आई-वडील गुजरातहून मुंबईत दाखल झाले आहेत.
मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा
हॉटेल 1 Above चे मालक हितेश संघवी, जिगर संघवी आणि अभिजीत मानकर यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे सर्व एलएलपी कंपनीचे मालक आहेत. ONE ABOVE आणि मोजोज बिस्त्रो पब तेच चालवत असल्याची माहिती मिळत आहे. तसंच आगीची सुरुवात वन अबाव्ह रेस्टोबारमधून झाल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
कमला मिल्स आग : वाढदिवशीच खुशबूला मृत्यूने गाठलं!
मुख्यमंत्र्यांकडून चौकशीचे आदेश
दरम्यान, ही दुर्दैवी घटना असल्याचं सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कमला मिल्स कम्पाऊंडमधील आगीच्या चौकशीचे आदेश दिले आहेत.
"कमला मिल्स कम्पाऊंडमधील दुर्दैवी घटनेतील मृतांच्या नातेवाईकांचं मी सांत्वन करतो आणि तर जखमींच्या प्रकृतीत लवकरात लवकर सुधारणा व्हावी यासाठी प्रार्थना करतो. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याचे आदेश मुंबई महापालिका आयुक्तांना दिले आहेत," असं ट्वीट मुख्यमंत्र्यांनी केलं आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
भारत
व्यापार-उद्योग
निवडणूक
Advertisement