एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मंजुळा शेट्ये हत्या: स्वाती साठेंचा व्हॉट्सअॅप मेसेज, आरोपींनाच पाठिंबा
मुंबई: भायखळा जेलमधील कैदी मंजुळा शेटयेच्या हत्याप्रकरणानंतर आता नव्या वादाला तोंड फुटलं आहे. मंजुळाच्या हत्येतील आरोपी असलेल्या 6 महिला पोलिसांची, चौकशी अधिकारी स्वाती साठेंनीच पाठराखण केली आहे.
व्हॉट्स अॅप ग्रुपवर साठेंनी आरोपी महिला अधिकाऱ्यांचं जाहीरपणे समर्थन केलं आहे. आरोपींना अटक केल्यानंतर त्या ग्रुपवर साठे यांनी ‘आता तरी मीडियाचा आत्मा शांत होईल का?’ अशी पोस्ट टाकली.
साठे यांनी काही अधिकाऱ्यांची नावे घेत ‘आपण जेलकर्मी अधिकारी, कर्मचारी आपल्या भगिनींना भक्कम आधार देऊ,’ असं लिहिल्याची तक्रार ठाणे जेलचे निलंबित जेलर हिरालाल जाधव यांनी केली आहे. तसंच आरोपींच्या मदतीसाठी पैसे गोळा केल्याचा आरोप साठेंवर केला जात आहे.
दरम्यान या तपासातून आपल्याला दूर करावं अशी मागणी स्वाती साठेंनी जेल प्रशासनाकडे केली आहे.
काय आहे नेमकं प्रकरण?
भायखळा जेलमधील मंजुळे शेट्ये या महिलेचा शनिवार (24 जून 2017) मृत्यू झाला होता. अधिकाऱ्याच्या मारहाणीनंतर मंजुळे शेट्येचा मृत्यू झाल्याचा आरोप आहे.
महिला कैद्याच्या हत्येपूर्वी तिच्यावर सहा महिला अधिकाऱ्यांकडून लैगिंक अत्याचार झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, मंजुळा शेट्ये हिच्याकडून दोन अंडी व पाच पावांचा हिशेब लागत नसल्याचे निमित्त करून तिला मारहाण करण्यात आली. एका बॅरेकमध्ये मंजुळाला नग्न करून लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यात आली तसेच तिचा लैंगिक छळही करण्यात आल्याचा आरोप करण्यात येत आहे.
Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण!
या प्रकारानंतर वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी धीर देत महिला कैद्यांना बोलतं केलं. तेव्हा इतर महिला कैद्यांनी घडल्या प्रकाराची माहिती त्यांना दिली. त्यानंतर एका महिला कैद्याच्या तक्रारीवरुन नागपाडा पोलिसांनी गुन्ह्याची नोंद केली आहे.
तक्रारीत कैदी महिलेने लैंगिक छळाचा आरोप केला आहे. आता पोलीस त्या अनुषंगाने तपास करीत आहेत. दरम्यान, या प्रकरणातील साक्षीदारांना तपास पूर्ण होईपर्यंत अन्य कारागृहात हलवण्यात यावे अशी मागणी शेट्ये कुटुंबीयांनी केली आहे. संबंधित बातम्या Exclusive : मंजुळा शेट्येवर अनन्वित अत्याचार आणि मारहाण! भायखळा जेलमध्ये महिला कैद्याचा संशयास्पद मृत्यू भायखळा जेलमध्ये हत्येपूर्वी महिला कैद्यावर लैंगिक अत्याचार मंजुळा शेट्येंवर निर्भयासारखेच अत्याचार, इंद्राणी मुखर्जीचा गंभीर आरोप महिला कैदी मृत्यू प्रकरण : महिला आयोगाकडून सुमोटो तक्रार दाखलअधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement