मुंबई : एकीकडे मुंबईतील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढत असताना मुंबईतील काही महत्त्वाHowdy, snehakadam

ची आणि मोठी रुग्णालयं बंद करण्यात आली आहेत तर काही ठिकाणी फक्त इमर्जन्सी सेवा देण्यात येत आहे. ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत, यांच्या संपर्कात आलेले डॉक्टर, नर्स, हेल्थ वर्कर यांच्या स्वॅब टेस्ट करण्यात येत आहेत. मुंबईतील वोक्हार्ट, भाटिया रुग्णालय बंद करण्यात आले आहे तर ब्रीच कँडी, जसलोकमध्ये ओपीडी सेवा बंद करण्यात आल्या आहेत


भाटिया रुग्णालय पूर्ण बंद
या ठिकाणी उपचारासाठी आलेल्या तीन रुग्णांना कोरोना पॉझिटिव्ह आल्याने त्याच्या संपर्कत आलेल्या डॉक्टर, नर्स, कर्मचाऱ्यांची स्वबॅ टेस्टिंग केली जाणार आहे. या ठिकाणी कोरोनावर उपचार होत नसताना, अशा प्रकारे इतर उपचार घेत असलेले रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढल्याने हे रुग्णालय बंद करावा लागलं.


वोक्हार्ट रुग्णालय पूर्ण बंद
वोक्हार्ट रुग्णालयात 17 मार्च रोजी हार्ट पेशंट उपचार घेत होता. त्याला 26 मार्च रोजी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचं कळलं. नंतर त्याच्या संपर्कत आलेले डॉक्टर, नर्स, कर्मचारी सुद्धा कोरोनाबाधित झाल्याने हे रुग्णालय बंद करण्यात आलं.


Coronavirus | मुंबईतील जसलोक हॉस्पिटलच्या 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण


ब्रीच कँडी रुग्णालय - ओपीडी आणि इतर सेवा बंद, अत्यावश्यक सेवा सुरु
ब्रीच कॅण्डी रुग्णालयात काम करणारी आणि माहिम भागात राहणारी नर्स कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याने तिच्या संपर्कात आलेल्या लोकांचे स्वॅब टेस्ट केली जाणार आहे. ती नर्स माहिमला ज्या नर्सेस हॉस्टेलमध्ये राहत होती, ते सुद्ध बंद करण्यात आलं आहे. शिवाय ती ज्या गाडीने माहिम ते ब्रीच कँडी असा प्रवास करत होती, त्यामधील संपर्कात आलेल्या लोकांची सुद्धा टेस्ट केली जाणार आहे


जसलोक रुग्णालय - अत्यावश्यक, कोविड-19 वॉर्ड सुरु
जसलोक हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी आलेल्या कोरोनाबाधित रुग्णाकडून 21 कर्मचाऱ्यांना लागण झाली आहे. सुरुवातीला एका नर्सला ही लागण झाली. त्यानंतर सुरक्षिततेचा उपाय म्हणून हॉस्पिटलने त्यांच्या 1005 कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी केली, ज्यात 21 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं. या घटनेनंतर खबरदारी म्हणून जसलोक प्रशासनाने 13 एप्रिलपर्यंत हॉस्पिटल बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. फक्त इमर्जन्सी आणि कोविड-19 हेच वॉर्ड सुरु राहणार आहेत.


Coronavirus | मुंबईतील केईएम रुग्णालयातील डॉक्टरला कोरोनाची लागण