एक्स्प्लोर
नासा पुरलेले बॉम्ब शोधतं, तुम्ही रेल्वे रुळाचे तडे तरी शोधा: हायकोर्ट

प्रातिनिधीक फोटो
मुंबई: मुंबईची लाईफ-लाईन असलेल्या लोकल रेल्वेवरुन हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला चांगलंच झापलं. नासा जर अवकाशातून जमिनीत पुरलेले बॉम्ब शोधू शकतं, तर चांद्रयान पाठवणारे आपले शास्त्रज्ञ रेल्वे रूळांवरचे तडे शोधू शकत नाहीत का? असा सवाल हायकोर्टाने रेल्वे प्रशासनाला विचारला. तसंच रेल्वे रुळांवरील तडे शोधण्यासाठी अद्ययावत तंत्रज्ञानाची मदत घ्या, सर्व रेल्वे स्थानकांवर आपत्कालीन वैद्यकीय कक्ष स्थापन करण्याबाबत विचार करा, असा सल्लाही हायकोर्टने दिला. याशिवाय मध्य आणि पश्चिम दोन्ही रेल्वे मार्गावरील संरक्षक भिंतींचं काम तातडीन पूर्ण करण्याचे आदेशही हायकोर्टने दिले. रेल्वे रुळाला तडे गेल्याने लोकल वाहतूक विस्कळीत होण्याचं प्रमाण, सध्या नियमित झालं आहे. सातत्याने प्रवाशांना मनस्तापाला सामोरं जावं लागतं. त्यामुळेच हायकोर्टाने या सर्व सूचना केल्या आहेत.
Before You Go
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा





















