एक्स्प्लोर

होर्डिंगसाठी परवानगी असलेल्या भागांची यादी जाहीर करावी; बेकायदा होर्डिंगबाबत हायकोर्टाची सूचना 

होर्डिंग लावायला कुठे परवानगी आहे हे कळलं तर सर्वत्र होर्डिंग लागणार नाहीत, आणि विनापरवानगी होर्डिंग लावणाऱ्यांवर कारवाई करणंही पोलिसांना सोपं होईल असं हायकोर्टानं म्हटलं आहे.

मुंबई: राजकीय नेत्यांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून केलेल्या होर्डिंगबाजीचा मुद्दा गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयात चर्चेला आला. नुकत्याच पार पडलेल्या माजी मुख्यमंत्र्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांना शुभेच्छा देणारे लाखो बेकायदेशीर फलक मुंबई आणि ठाण्यात लागले होते अशी माहिती या प्रकरणातील याचिकाकर्ते सुस्वराज्य फाऊंडेशन यांच्या वतीनं हायकोर्टाला देण्यात आली. त्याची दखल घेत राजकीय नेते आणि मंत्र्यांनी त्यांचे फोटो बॅनर, होर्डिंग्जवर लावण्यापासून कार्यकर्त्यांना स्वत:हून रोखले पाहिजे, तसे केल्यास अनधिकृत होर्डिंग्जवर आळा बसेल अशी भावना हायकोर्टानं व्यक्त केली.  

सर्व महापालिका आणि जिल्हा परिषदांनी होर्डिंग्ससाठी परवानगी दिलेल्या जागांची यादी वॉर्ड आणि पोलीस ठाण्यानुसार जाहीर करावी. या यादीचे योग्य पद्धतीने पालन केल्यास पोलिसांनाही बेकायदेशीर होर्डिंग्जविरोधात कारवाई करण्यास मदतच होईल असं नमूद करत हायकोर्टानं राज्य सरकारला अनधिकृत होर्डिंग्जबाबतच्या उपाययोजनांचा अहवाल सादर करण्याचे निर्देश देत सुनावणी 12 ऑगस्टपर्यंत तहकूब केली.  

राज्यभरात राजकीय पक्षांनी लावलेल्या बेकायदेशीर बॅनर, होर्डिंग्ज आणि पोस्टर्सच्या मुद्द्यावर अनेक जनहित याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. अशा होर्डिंग्जमुळे सार्वजनिक जागेचं विद्रुपीकरण होतं. साल 2016 रोजी मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकार आणि सर्व महापालिकांना सार्वजनिक ठिकाणी कोणतेही बेकायदेशीर होर्डिंग लागणार नाहीत त्याची खात्री करण्याचे निर्देश देत अधिकाऱ्यांना त्यावर केलेल्या कारवाईचा अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. त्यानुसार, गुरुवारी मुख्य न्यायमूर्ती दीपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या याचिकांवर सुनावणी पार पडली.

न्यायपालिका महापालिका कार्यकारिणीच्या कार्यक्षेत्रात प्रवेश करून आदेशांची अंमलबजावणी करू शकत नाही. मात्र, न्यायालयाने एक आदेश दिला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी आम्हाला कार्यकारिणीवर अवलंबून राहावे लागत असल्याचं मत खंडपीठाने नमूद केलं. रस्त्यावर जाऊन आम्हीच दिलेल्या आदेशाची आम्ही अंमलबजाणी करू शकत नाही. जोपर्यंत राज्य सरकारकडून त्यादिशेनं प्रामाणिक प्रयत्न होत नाही, तोपर्यंत ही अंमलबजावणी कधीही होणार नाही, असं परखड मत यावेळी खंडपीठाने स्पष्ट केलं.  

नेत्यांनी कार्यकर्त्यांचे हट्ट थांबवावे
राज्याचे माजी आजी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांनी विशेषतः मुंबईत बॅनर आणि होर्डिंग्ज लावल्याचे याचिकाकर्त्यांनी खंडपीठाच्या निदर्शनास आणून दिले. त्यावर राजकीय पुढाऱ्यांनी नियमांचे पालन करणं आवश्यक आहे. ज्या मंत्र्यांचे होर्डिंग्ज लावले आहेत त्यांनी कार्यकर्त्यांना तसे न करण्याचे आवाहन करावं तसेच कार्यकर्त्यांचे हे हट्ट पुरविणे बंद केल्यास बेकायदेशीर होर्डिंग्सबाजीस आळा बसेल. नेते मंडळींनीच जनतेसमोर येऊन त्यांना होर्डिंग्ज लावण्यापासून त्यांना रोखायला हवं, त्यांनी सांगितल्यास जनता त्यांचं नक्कीच ऐकेल असं मतही हायकोर्टानं नमूद केलं.



महत्त्वाच्या बातम्या

'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
'वंदे मातरम'वरुन जुंपली, फडणवीस म्हणाले, हा दिमागी नक्षलवाद; काँग्रेस नेत्यांचाही जशास तसा पलटवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
अभिजीत दिपकेंची ZP शाळेला भेट; शालेय पोषण आहाराची नोंद वेगळीच, फुटलेल्या खिडकीला एकनाथ शिंदेंचा बॅनर
Harshvardhan Sapkal: वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...
वंदे मातरम काँग्रेसचीच संस्कृती, भाजप अन् संघाने आम्हाला शहाणपणा शिकवू नये; सोनिया गांधींबाबतच्या भाजपच्या दाव्यावर हर्षवर्धन सपकाळांनी सुनावलं, म्हणाले...

व्हिडीओ

Special Report Gandhi Topi : उर्दू शाळेची शान, गांधी टोपीला मान, गणवेशात गांधी टोपी
Pm Modi Speech Highlites : मोदींच्या लाल किल्ल्यावरील भाषणातले टॉप 10 मुद्दे
Sanjay Raut Mumbai : १५०० रुपये देऊन मते विकत घेतली अन् ईव्हीएमचा घोटाळा केला- संजय राऊत
Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Hasan Mushrif : रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या परिस्थितीवरुन पालकमंत्री हसन मुश्रीफ नाराज
रस्त्यांची अवस्था पाहून मला आज लाज वाटली; नंदुरबारमधील रस्त्यांच्या स्थितीवरुन हसन मुश्रीफ नाराज
Bar Council : बार काऊन्सिल ऑफ इंडियाच्या अध्यक्षांनी NALSAR प्रकरणी विद्यार्थ्यांची माफी मागितली, वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न
बार काऊन्सिलच्या अध्यक्षांनी विद्यार्थ्यांची माफी मागितली,वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न 
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
प्रेरणादायी... पोलीस शिपाई ते सहाय्यक आयुक्त; ACP अशोक होनमाने 'अतिउत्कृष्ट सेवा पदकाने' सन्मानित
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, गोपीनाथ मुंडे काँग्रेसमध्ये येणार होते, सगळं ठरलं होतं; पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
बीडमध्ये धनंजय मुंडेंच्या दोन मागण्या, पंकजा मुंडेंकडून एक लगेच मान्य; सुनेत्रा पवार म्हणाल्या मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचवते
Rohit Pawar : तलाठी भरतीत भ्रष्टाचार झाल्याचं सिद्ध झालंय, तत्कालीन महसूलमंत्री म्हणून जबाबदारी स्वीकारुन राजीनामा द्या, रोहित पवार यांचं राधाकृष्ण विखे पाटील यांना आव्हान
मुख्यमंत्र्यांनी मंत्रिमंडळ खातेवाटपात आपलं स्थान कुठं ठेवलं, कधीतरी आत्मपरिक्षण करा, रोहित पवार यांचा विखे पाटलांना टोला
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 15 ऑगस्ट 2026 | शनिवार
Life Insurance : स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल,सरासरी प्रीमियममध्ये 42 टक्के वाढ
स्वातंत्र्यदिनी भारतीयांचा जीवन विम्यावर विश्वास वाढला; मोठ्या पॉलिसी घेण्याकडे ग्राहकांचा कल
Embed widget