एक्स्प्लोर

खड्डे-रस्त्यांच्या समस्या असताना फायर ब्रिगेडची पडले, कोर्टाने पालिकेला झापलं

19 जून 2017 रोजीच हे केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले असतानाही ते अजून पूर्ण का केले नाहीत? असा सवाल करत हायकोर्टानं मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तात्पुरतं अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिले

मुंबई : मलबार हिलमधील रहिवाश्यांचा विरोध डावलून प्रियदर्शनी पार्कमध्ये फायर ब्रिगेड स्थानक उभारण्याचा प्रयत्न करु पाहणाऱ्या महापालिका प्रशासनाला मुंबई हायकोर्टानं चांगलंच धारेवर धरलं आहे. मुंबईच्या रस्त्यांवर खड्यांचं साम्राज्य वाढतंय, रस्ते अपघातात लोकांचे जीव जातायत आणि तुम्हाला फायर ब्रिगेडची पडली आहे? असा सवाल कोर्टाने केला आहे. आधी इतर समस्यांकडे गांभीर्यानं पाहा, अशा शब्दांत मुंबई उच्च न्यायालयानं महानगरपालिकेला खडसावलं आहे. पालिकेच्या वतीनं उभारण्यात आलेलं तात्पुरतं अग्निशमन केंद्र ताबडतोब हटवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले आहेत. 19 जून 2017 रोजीच हे केंद्र हटवण्याचे निर्देश हायकोर्टानं दिले असतानाही ते अजून पूर्ण का केले नाहीत? असा सवाल करत हायकोर्टानं मंगळवारी सकाळी 11 वाजेपर्यंत तात्पुरतं अग्निशमन केंद्र हटवण्याचे आदेश दिले. बुधवारी मलबार हिल रहिवाशी संघटनेच्या वतीनं दाखल याचिकेवर पुन्हा सुनावणी होणार आहे. फायर ब्रिगेडमुळे प्रियदर्शनी पार्कमध्ये जॉगिंगला येणाऱ्या रहिवाश्यांना त्रास होत असल्याचं सांगत स्थानिक रहिवाशी संघटनेनं याविरोधात हायकोर्टात धाव घेतली होती. प्रियदर्शनी पार्कचा भूखंड हा फायर ब्रिगेडसाठी राखीव आहे, असा दावा करत पालिकेनं तिथं उभारण्यात आलेला जॉगिंग ट्रॅक हा बेकायदेशीर असल्याचा आरोप हायकोर्टात केला होता. तसंच 14 जून 2017 ला तात्पुरतं अग्निशमन केंद्र उभारल्यापासून तिथं 29 कॉल्स घेण्यात आले आहेत. नियमानुसार 50 हजार लोकसंख्या असलेल्या विभागात स्वतंत्र अग्निशमन केंद्र असणं आवश्यक आहे. याआधी मलबार हिल परिसरात नाना चौकातून अग्निशमन सेवा पुरवली जायची. मात्र ट्राफिकमुळे घटनास्थळी तात्काळ पोहचणं कठीण जायचं. त्यामुळे प्रियदर्शनी पार्क इथं एक छोटेखानी अग्निशमन केंद्र उभारण्याचा निर्णय घेण्यात आला, अशी भूमिका पालिकेनं हायकोर्टात मांडली.

महत्त्वाच्या बातम्या

मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
मुंबई अत्याचार प्रकरण! आरोपींना कायद्याचा धाक राहिला नाही, शक्ती कायद्यासारखा कायदा तातडीने लागू करणं गरजेचं : रोहित पवार
नेरुळच्या रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना,  कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
नेरुळच्या रेल्वे स्टेशनवर धक्कादायक घटना,  कर्तव्यावर असलेल्या पोलिस कर्मचाऱ्यांवर हल्ला करण्याचा प्रयत्न, व्हिडीओ व्हायरल
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
Vasai News: वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!
वसईतील 'त्या' भयानक महापुराचा धडकी भरवणारा पुरावा; तब्बल 12 दिवसांनी नाल्यातून बाहेर काढली कार, अवस्था पाहून तुम्हालाही बसेल धक्का!

व्हिडीओ

Girija Raut PC : मारहाण, फसवणूक, अघोरी कृत्य ते राजकीय दबाव, विनायक राऊतांच्या सुनेचे खळबळजनक आरोप
Vinayak raut PC : मुलावर सुनेचे गंभीर आरोप, विनायक राऊत काय म्हणाले?
Eknath Khadse on BJP : एकनाथ खडसेंच्या भाजप प्रवेशावरून गुलाबराव पाटलांचा खोचक टोला
Supriya Sule Nashik Speech : पांडुरंग म्हणतो माझे दर्शन घ्यायला येऊ नका, सेवा केली तर मी दर्शन द्यायला येईल
Sanjay Raut Vs Devendra Fadnavis Special Report : राऊतांनी डिवचलं, बावनकुळे, फडणवीसांना शुभेच्छा

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Friends Story : जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
जिंकलस मित्रा! 35 वर्षांपूर्वी सौदीत घेतले होते 25 हजार रुपये, गुगलचा वापर करत घर शोधून पैसे परत, मन जिंकणारी स्टोरी
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
मुंबईत अवघ्या सात वर्षाच्या चिमुरडीवर सुरक्षारक्षकाचा वॉशरूममध्ये घुसून अत्याचार; मुलगी वॉशरूमला गेली असता बदमाशाचे हैवानी कृत्य, संतप्त नागरिकांचा पोलिस स्टेशनला घेराव, राहुल नार्वेकरही पोहोचले
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
खरे हिंदूद्रोही, देशद्रोही भाजपवालेच, सीसीटीव्हीला धोतर लावून राम मंदिरात दानपेटीतून चोरी, सीबीआय, आयटी भाजपचे पोपट, ईडीला चंपत राय दिसत नाही, आता शेखर सुमन दिसतील; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
पहलगाममध्ये ढगफुटीने थरकाप, शेती, रस्ते वाहून गेले, उत्तराखंडमध्ये जलविद्युत प्रकल्पाजवळ भूस्खलन; देशाच्या सुमारे 70 टक्के भागातून मान्सूनचे ढग गायब
Dhanashree Verma: 'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'लग्नाच्या अवघ्या दुसऱ्याच महिन्यात...', घटस्फोटीत पत्नी धनश्री वर्माचे युझवेंद्र चहलवर गंभीर आरोप
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
'सध्या राम मंदिर आरएसएस-भाजपचं कार्यालय झालंय, ट्रस्ट सरकारनेच केला, SIT त्यांनीच केली, चोर पण तेच आणि पोलिस सुद्धा तेच असल्याने काय निर्णय होणार? शंकराचार्यांचा हल्लाबोल
Goa Fort Ratnagiri: संवर्धनाच्या नावावर कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
संवर्धनासाठी कोट्यवधींचा खर्च, अन् एका पावसात शिवरायांच्या किल्ल्याची तटबंदी पुन्हा ढासळली, कामाच्या गुणवत्तेबाबत गंभीर प्रश्न
Pune News: पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
पुणेकरांना मोठा दिलासा! तूर्त पाणीकपात नाही, धरण साखळीत समाधानकारक साठा; पुढील आठवड्यात होणार अंतिम निर्णय
Embed widget