एक्स्प्लोर

Mumbai Rain : मुंबईत पावसाची दमदार हजेरी; पश्चिम उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस,अंधेरी सबवे वाहतुकीसाठी बंद

मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे.

मुंबई : मुंबईच्या (Mumbai Rain)  पश्चिम उपनगरात मागील अर्धा तासापासून मुसळधार पाऊस सुरू आहे. मुंबईसाठी  आज हवामान विभागाने ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. 100 मिमीहून अधिक पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.  मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी  ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे.  पावसाला पुन्हा सुरुवात झाल्यानं बळीराजाच्या चेहऱ्यावर आनंद दिसत आहे.

पश्चिम उपनगरात अंधेरी, जोगेश्वरी, गोरेगाव,मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले,वांद्रे, सांताक्रुज परिसरात सध्या पावसाची चांगली बॅटिंग सुरू आहे. पावसाचा जोर असाच कायम राहिला तर अर्ध्या ते एक तासांत सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. दरम्यान, ठाण्याकडून सीएसटीकडे जाणाऱ्या लोकल 10 ते 15 मिनिटं उशिराने धावत आहेत.

अंधेरी सबवे वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद

मुसळधार पाऊस असल्यामुळे मुंबईच्या सखल भागामध्ये पाणी भरायला सुरुवात झाली आहे. मुंबईचा अंधेरी सबवे (Andheri Subway) हा सखल भाग असल्यामुळं सबवे खाली पाणी भरले आहे. त्यामुळं हा मार्ग वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे खाली तीन ते चार फूट पाणी भरला आहे. सध्या वाहतुकीसाठी अंधेरी सबवे पूर्णपणे बंद करण्यात आला आहे. अंधेरी सबवे बंद झाल्यामुळे अंधेरी पूर्व आणि पश्चिम परिसरात मोठे वाहतूक कोंडी निर्माण व्हायला सुरुवात झाली आहे.

मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस

पुढील तीन दिवस राज्यात पावासाची शक्यता वर्तवली आहे.  मागील 24 तासात मुंबईतील धरण क्षेत्रात चांगला पाऊस पडला आहे.  तानसा 100  भरल्यानंतर धरणाचे दरवाजे उघडले आहेत. तसेच मध्य वैतरणातून देखील विसर्ग सुरु करण्यात आला आहे.  मोडकसागर देखील आज किंवा उद्यामध्ये 100  टक्के भरण्याची शक्यता  आहे. 

मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा

दुष्काळी सावट असलेल्या मराठवाड्यात आज काही ठिकाणी मुसळधार पावसाचा इशारा आहे. सोबतच कोकण आणि मध्य महाराष्ट्रात देखील काही ठिकाणी अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र आणि कोकणातील काही ठिकाणी  ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. विदर्भात देखील आज विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता आहे. 

हे ही वाचा :       

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !

व्हिडीओ

Supriya Sule Full PC : युतीचा काही फॉर्मल प्रस्वात माझ्याकडे आलेला नाही, सुप्रिया सुळेंचं स्पष्टीकरण
Raj Uddhav Thackeray Brothers Alliance : उद्या दुपारी 12 वाजता ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा होणार
Ratnagiri Lote MIDC : इटलीतून हद्दपार केलेला प्रकल्प रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे एमआयडीसीमध्ये सुरु
Subhash Jagtap On Prashnat Jagtap:प्रशांत जगतापांनी राजीनामा दिला अशी माहिती, सुभाष जगतापांची माहिती
Pune Mahaplalika NCP : अखेर पवारांचं ठरलं, पुणे महानगरपालिकेत दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
राहुल कलाटेंची कमाल, स्थानिक नेत्यांच्या नाकावर टिच्चून भाजपमध्ये प्रवेश करणार, पिंपरीत शरद पवार गटाला धक्का
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
अजित पवार अन् एकनाथ शिंदेंसाठी 'हा' धोक्याचा इशारा; फडणवीसांवर टीका करत काँग्रेसचा इशारा
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
धक्कादायक! ईव्हीएम मशिनवर राष्ट्रवादीच्या उमेदवाराचं नाव झाकलं, 7 कर्मचारी निलंबित, प्रांतलाही नोटीस
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरेंनंतर पवारांच्याही युतीची तारीख ठरली; अजित पवार 26 तारखेला घोषणा करणार !
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
मोठी बातमी! ठाकरे बंधूंच्या युतीची उद्या दुपारी 12 वाजता घोषणा; मुंबईचं जागावाटपही निश्चित, मनपासाठी ठाकरे सज्ज
BMC Election: ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
ठाकरे गट-मनसेचं जागावाटप 3 जागांमुळे अडलं, राज ठाकरेंनी भांडूपच्या अनिषा माजगावकारांना शिवतीर्थवर बोलवलं, रमेश कोरगावकारांच्या पत्नीच्या उमेदवारीचा मार्ग मोकळा?
Solapur Crime: रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
रूममध्ये झाडू मारायला दिला नकार, 11 वीच्या विद्यार्थ्याला तब्बल तीन तास स्टम्पने बेदम मारहाण; सोलापुरात रॅगिंगचा भयानक प्रकार
Sanjay Raut On Raj Thackeray And Uddhav Thackeray Alliance: उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
उद्धव ठाकरे अन् राज ठाकरेंची युती कधी जाहीर होणार?; संजय राऊतांनी अखेर जाहीर केलं, आजच्या पत्रकार परिषदेतील 5 मोठे मुद्दे
Embed widget