एक्स्प्लोर

कृपाशंकर सिंह अडचणीत, आता ईडी, आयकर विभागाकडून चौकशीची शक्यता

मुंबई : बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी काँग्रेसचे नेते कृपा शंकर सिंह यांच्या अडचणीत पुन्हा वाढ झाली आहे. याआधी एसीबी आणि सीबीआय यांच्या चौकशीने कृपाशंकर सिंह यांना घाम फोडला होता, तर आता ईडी आणि आयकर विभागाच्या चौकशीचा फास कृपाशंकर सिंह यांच्याभोवती आवळणार असं दिसतं आहे. कृपाशंकर सिंह यांच्यावर दाखल असलेले गुन्हे, आरोप आणि तपास लक्षात घेता हे प्रकरण मनी लॉन्डरिंग अॅक्टमध्ये मोडत असल्याचे दिसते. त्यामुळे या प्रकरणी ईडीचे काय म्हणणे आहे, अशी विचारणा करत मुंबई उच्च न्यायालयाने ईडीला नोटीस जारी केली. तर दुसरीकडे कृपाशंकर सिंह यांच्या 4 पॅनकार्डबाबत तक्रारारदाराने दिलेल्या माहितीनुसार आयकर विभागाने आज न्यायालयात अहवाल सादर केला. त्यानुसार 4 पैकी 2 पॅनकार्ड नंबर हे चुकिचे आहेत, तर एक पॅनकार्ड रद्द झाले असून एक पॅनकार्ड हे सुरु असल्याची माहिती आयकर विभागाने मुंबई उच्च न्यायालयाला दिली. त्यावर न्यायालयाने आश्चर्य व्यक्त करत एका व्यक्तीचे एकापेक्षा जास्त पॅनकार्ड असणे हा गुन्हा नाही का? आयकर विभागाला यांची कल्पना नाही का? तुम्ही याबाबत काही तपास केलाय का? गुन्हा दाखल केलाय का? अशा कारवाईबाबत आयटी अॅक्टमध्ये काही तरतूद आहे का? अशा प्रश्नांची फैरी झाडत आयकर विभागाला मुंबई उच्च न्यायालयाने झापले. या सर्व प्रकरणी दोन आठवड्यात आपले म्हणणे मांडावे असे आदेश आयकर विभागाला दिले आहेत. न्यायमूर्ती रणजीत मोरे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर यांच्या खंडपीठाने हे आदेश दिले आहेत. गेल्या सुनावणीच्यावेळेस कृपाशंकर सिंह आणि त्यांच्या कुटुंबीयांविरोधात दाखल बेहिशेबी मालमत्तेप्रकरणी आतापर्यंत काय तपास केला तपास संपला आहे की अद्यापही सुरू आहे आणि असल्यास त्याची सध्या स्थिती काय आहे, अशी प्रश्नांची सरबत्ती करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल तीन आठवडय़ांत सादर करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला गेल्या सुनावणीला दिले होते. एसीबीकडून या प्रकरणाचा योग्य तपास करण्यात आलेला नाही, असा आरोप करत तपासाची सूत्रे सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी तुलसीदास नायर यांनी एका याचिकेद्वारे मागणी केली होती. त्यावेळी सुनावणीच्या वेळेस हायकोर्टाने या प्रकरणाच्या स्थितीबाबत विचारणा करत त्याबाबतचा मोहोरबंद अहवाल सादर करण्याचे आदेश अतिरिक्त सरकारी वकील एफ. आर. शेख यांना दिले होते. परंतु तपास एसीबीतर्फे करण्यात येत आहे. तसेच उच्च न्यायालयाने वा राज्य सरकारने तपासाची सूत्रे वर्ग केली तरच सीबीआयकडून तपास केला जातो. याप्रकरणी अद्याप असे काहीच झालेले नाही, असे सीबीआयच्या वतीने अॅड. हितेन वेणेगावकर यांनी न्यायालयाला सांगितले होते. त्यामुळे एसीबीच्या अहवालानंतर तपास सीबीआयच्या ताब्यात जाणार की नाही हे निश्चित होईल. कृपाशंकर सिंह आणि कुटुंबियांच्या बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी उच्च न्यायालयाने एसीबीला या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले होते. परंतु चौकशीच्या नावाखाली एसीबीने काहीच केलेले नाही. त्यामुळे हा तपास सीबीआयकडे वर्ग करण्याची मागणी याचिकाकर्ते नायर यांनी न्यायालयाकडे गेल्या सुनावणीला केली होती.

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis : राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
राज म्हणाले, कुंभमेळ्यासाठी गुजरातचे कॉन्ट्रॅक्टर आणलेत; मुख्यमंत्री म्हणाले, ज्यांची बीड कपॅसिटी... 
Prashant Kishor and Sunil Tatkare: प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत थेट नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
प्रशांत किशोरांनी सुनील तटकरेंबाबत नाराजी व्यक्त करताच जय पवारांनी फक्त एकच प्रश्न विचारला, म्हणाले...
Gunaratna Sadavarte and Manoj Jarange Patil: 'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
'ठाणे का रिक्षा' म्हटल्यावर एकनाथ शिंदेंच्या आग लागते मग बावनकुळेंविषयी जरागेंनी वापरलेली अपमानस्पद भाषा पटते का? गुणरत्न सदावर्ते कडाडले
Eknath Shinde OBC : जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!
जरांगे पाटलांची काल सडकून टीका, आज एकनाथ शिंदेंनी मर्जीतील नेत्याला ओबीसी महाअधिवेशनात धाडलं, मुख्यमंत्र्यांकडूनही 'खास' संदेश!

व्हिडीओ

Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT
Kunbi Certificate Issues Special Report : मराठा आरक्षणाचा पेच वाढला? कुणबी दाखलेच अवैध? | Special Report
Dharashiv News Special Report : धाराशिव जिल्हा परिषदेच्या दोन तास टीव्ही, मोबाईल बंद उपक्रमाला सुरुवात | Special Report
Analogue paneer Special Report : महाराष्ट्रात ॲनालॉग पनीरवर वर्षभराची बंदी, तुकाराम मुंढेंचा तडाखा
Mumbai Mayor Bungalow Special Report : मुंबई महापालिकेचा नव्या टेंडरमुळे वादंग : Ritu Tawade

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Gold Rate : पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
पाच दिवसांमध्ये सोने 6400 रुपयांनी महागलं, चांदीच्या दरात 12 हजारांची वाढ, जाणून घ्या सोने चांदीचे नवे दर
Ratnagiri News : रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
रत्नागिरीमधील कामथे उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. कांचन मदार लाचप्रकरणी निलंबित; आरोग्य विभागाची कारवाई
Prithviraj Chavan: इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
इकडं संजय राऊतांचे केंद्रीय शिक्षण मंत्रीपदासाठी फडणवीसांवरून दाव्यांवर दावे, पण पृथ्वीराजबाबांनी मांडली वेगळीच भूमिका! थेट म्हणाले, 'त्यांना केंद्रात संधी मिळाल्यास देशातील Gen Z आणि काँग्रेस...'
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
SC-ST आरक्षणात 'क्रिमी लेयर'चे तत्त्व लागू होत नाही, ही संकल्पना केवळ OBC आणि SEBC आरक्षणांना लागू; केंद्र सरकारचे सुप्रीम कोर्टात प्रतिज्ञापत्र
Abhijeet Dipke: 'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
'मी कुणाला भेटायचं हे पोलिसांनी नाही सांगायचं'; अभिजीत दिपके पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, Video
Sushma andhare: तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
तर शिंदेंना फडणवीस भूमिका घेऊ देतील? मग ते फडणवीस कसले? दोघांच्या कोल्ड वॉरमध्ये जीव मात्र गरीब मराठ्यांचा जातोय; सुषमा अंधारेंचा प्रहार
Mumbai Local Train: मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
मुंबईतील लोकल ट्रेनमध्ये पुरुष प्रवाशाची महिलेला मारहाण, सहप्रवाशी थंडपणे पाहत बसले!
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
क्लासेस ठरवणार विद्यार्थ्यांनी कोणत्या कॉलेजमध्ये जायचं? ही कुठची शिक्षण पद्धत? क्लासमध्ये आठ-आठ तास गेल्यानंतर कॉलेजमध्ये अटेंडन्स कसा लागतो? राज ठाकरेंकडून शिक्षणातील धंद्याची चिरफाड
Embed widget