एक्स्प्लोर

शेर को किसी की जरुरत नहीं, हार्दिकची शिवसेनेला साथ

मुंबई : "शेर तो शेर ही होता है, उसे किसी की जरुरत नहीं," असं म्हणत अपाटीदार आंदोलनाचा युवा नेता हार्दिक पटेलने शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली आहेत. भाजपवर हल्ला चढवला आहे. मुंबईत 'मातोश्री'वर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेल यांची संयुक्त पत्रकार परिषद झाली. यावेळी हार्दिक पटेलने शिवसेनेला पाठिंबा देत भाजपवर निशाणा साधला. "महाराष्ट्राची भूमी ही वीरांची भूमी आहे. त्याच भूमीतील चांगल्या लोकांना भेटायला आलो आहे. सध्या देशाची सत्ता वाईट लोकांची आहे," असं हार्दिक पटेल म्हणाला. "मी अजून लहान असून शिकत आहे. माझी शिवसेनेला गरज का असेल? शेर तो शेर ही होता है, उसे किसी की जरुरत नहीं, " अशा शब्दांत हार्दिक पटेलने शिवसेनेवर स्तुतीसुमनं उधळली. तसंच जिथे चांगलं होत आहे किंवा ज्यांना काही चांगलं करायचं आहे, तिथे त्यांच्यासोबत आहे, असंही त्याने नमूद केलं. शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या निधनावेळी उद्धव ठाकरेंची भेट घेता आली नाही. त्यामुळे बाळासाहेबांच्या स्मृतींना अभिवादन करण्यासाठी तसंच इथल्या गुजराती समाजाच्या भेटीसाठी मुंबईत आल्याचं हार्दिक पटेलने सांगितलं. दरम्यान, शिवसेनेला पाठिंबा असला तरी प्रचारात सहभागी होणार नसल्याचंही हार्दिक पटेलने स्पष्ट केलं आहे. मित्र दगा देईपर्यंत मैत्री तोडत नाही : उद्धव ठाकरे राजकारण तर चालतच राहील, पण आता आम्ही हार्दिकला मित्र मानलं आहे.  सगळ्या जगाला माहित आहे की आम्ही जेव्हा मैत्री करतो ती शेवटपर्यंत निभावतो. जोपर्यंत मित्र दगा देत नाही तोपर्यंत आम्ही कधी मैत्री तोडत नाही, अश उद्धव ठाकरे यांनी ठणकावून सांगितलं. मला 'हार्दिक' आनंद : मुख्यमंत्री दुसरीकडे उद्धव ठाकरे आणि हार्दिक पटेलच्या भेटीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चिमटा काढला आहे. शिवसेनेच्या पायाखालची वाळू निसटली आहे, त्यामुळे कोणाला बोलावलं हे पाहून मला 'हार्दिक' आनंद होतो आहे, असा टोला फडणवीस यांनी लगावला. तसंच नरेंद्र मोदींच्या आधी देवेंद्र फडणवीसला तरी निपटा, असं आव्हानही त्यांनी शिवसेनेला दिलं आहे.
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Single Window Clearance : राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
राज्यात आता 'लाईव्ह इव्हेंट्स'साठी धावपळ थांबणार; 'सिंगल विंडो' प्रणालीमुळे परवानगी प्रक्रिया होणार सुलभ
INFOCOM Mumbai : 'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
'इन्फोकॉम' परिषदेत आयटी मंत्री आशिष शेलार यांची उपस्थिती; एआय आणि डिजिटल परिवर्तनावर मंथन
Vidhan Parishad Election 2026: महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
महायुतीचं विधानपरिषदेचं जागावाटप अंतिम टप्प्यात, फॉर्म्युला ठरला, कोणती जागा कोणाच्या वाट्याला?
Monsoon Rain El NINO: महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?
महाराष्ट्रात यंदा कमी पाऊस पडणार, जून महिन्यात उष्णतेच्या लाटा; के.एस. होसाळीकरांनी काय-काय सांगितलं?

व्हिडीओ

Pune Liquor Tragedy : विषारी दारूमुळे १४ मृत्यू; पोलिसांच्या भूमिकेवरही सवाल | ABP Majha
NEET Exam Special Report : NEET पेपरफुटीनंतर मोठा निर्णय! आता PM मोदींकडे NEETचं नियंत्रण
Rahul Gandhi Special Report : सीबीएसई परिक्षेवरुन वाद, भाजप आणि राहुल गांधींमध्ये आरोप-प्रत्यारोप
Gunratna Sadavarte Mumbai : रीलस्टार मनोज, तुझ्या मागण्या बेकायदेशीर, गुणरत्न सदावर्ते बरसले
Manoj Jarange Protest Special Report : कडक उन्हात जरांगेंचं उपोषण, समजूत काढण्यास सरकारला यश येणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Parner Crime : धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
धक्कादायक! गतिमंद मुलाला बरं करण्याच्या बहाण्याने भोंदू बाबाने घातला 6 लाखांचा गंडा; ठार मारण्याची धमकी देत महिलेवर अत्याचार
Weather Update: हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
हवामान विभागाचा जून आणि जुलैमध्ये उष्णतेच्या लाटेचा इशारा; श्रीलंकेत मान्सून अडकल्याने अजूनही आठवड्याचीव प्रतीक्षा; यंदा 10 टक्के कमी पावसाचा अंदाज
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
कर्नाटकात डीकेंसाठी मार्ग प्रशस्त केला, पण राजीनाम्यानंतर सिद्धरामय्यांची भलतीच खेळी; काँग्रेसने 'रिमोट'चा डाव वेळीच ओळखला अन्
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
हार्दिक पांड्याला मुंबई काही केल्या सोसवेना, सलग तिसऱ्यांदा चर्चा रंगली, संघ बाहेर पडताच नेमकं कोणाकडे बोट दाखवत आता झेपत नाही म्हणाला?
Vaibhav Sooryavanshi IPL 2026 : IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
IPLच्या इतिहासात जे कधीच घडलं नाही, ते एका 15 वर्षांच्या पोराने करून दाखवलं; वैभव सूर्यवंशीने पुन्हा मोडले अनेक विक्रम, दिग्गजही चक्रावले
Lalit Modi on Sanjiv Goenka: 'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
'संजीव गोयंकासारख्या लोकांमुळे आता आयपीएलच्या फक्त मैदानातच नव्हे, तर...' रिषभ पंतचा राजीनामा पडताच ललित मोदी भलताच पेटला
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
न्यूयॉर्कचे महापौर जोहरान ममदानींचा इराण युद्धाला विरोध; म्हणाले, 'हजारो जीव गेले, एका अविचारी निर्णयाची किंमत जनता मोजत आहे'
Rahul Gandhi: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Video: राहुल गांधींची रिक्षाचालकांसोबत थेट आमनेसामने 'मन की बात'; पार्कमध्ये जमिनीवर मांडी घालून बसत 'लंच पे चर्चा' करत व्यथा जाणल्या
Embed widget