मुंबई : तीन तरुणींच्या डान्सचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. हा व्हिडीओ मुंबईतील जुहू बीचवर चित्रीत केला आहे. व्हिडीओमध्ये तिन्ही तरुणी सियाच्या प्रसिद्ध 'चिप थ्रिल्स' गाण्यावर डान्स करताना दिसत आहे.

 

 

व्हिडीओमध्ये काय आहे?

 

- कोरिओग्राफर तान्या चमोलीने 21 मे रोजी हा व्हिडीओ यू ट्यूबवर रिलीज केला होता.

 

- रिलीज झाल्यानंतर व्हिडीओ व्हायरल झाला. या व्हिडीओला यू ट्यूबवर प्रचंड व्ह्यूव्ज मिळत आहेत.

 

- इतकंच नाही तर फेसबुक आणि इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवरही हा व्हिडीओ शेअर केला जात आहे.

 

- अनेक लोकांनी या व्हिडीओवर कमेंट्स केल्या आहेत.

 

 

बीचवर डान्स करणाऱ्या या तरुणी कोण?

 

- या तिन्ही तरुणी दिल्ली यूनिवर्सिटीच्या पदवीधर आहे. 'चिप थ्रिल्स' गाण्यावरील त्यांच्या हिप-हॉप आणि क्रेझी मूव्ह्ज पाहण्यासारख्या आहेत.

 

- दिल्लीच्या तान्याने हा डान्स कोरिओग्राफ केला आहे. ती स्वत: एक उत्तर डान्सर आहे.

 

- दिल्ली यूनिव्हर्सिटीमधून इंग्लिशमधून पदवी मिळवलेली तान्या सध्या मुंबईत राहतील.

 

- व्हिडीओमध्ये तान्यासह हर्षिता आणि मोक्षदा आहेत. यांचा ट्रियो डान्सिंग मूव्ह अतिशय एनर्जेटिक आणि पाहण्यासारखा आहे.

 

- यू ट्यूबवर हा व्हिडीओ आतापर्यंत आठ लाखांपेक्षा जास्त वेळा पाहिला आहे.

 

 

काय आहे शियाचा चिप थ्रिल ?

 

- 'चिप थ्रिल्स' एक प्रसिद्ध पॉप सॉन्ग आहे. ऑस्ट्रेलियाची गायिका सिया फ्युरलरने हे गाणं गायलं आहे.

 

- हे गाणं 2016 मध्ये रिलीज झालेल्या तिच्या सातव्या स्टुडिओ अल्बम 'दिस इज अॅक्टिंग'मधून घेतलं आहे. 'चिप थ्रिल्स' हे गाणं सियासह ग्रेग कर्स्टनने लिहिलं आहे.

 

पाहा व्हिडीओ