मुंबई: गणेशोत्सव जवळ आला असून मुंबईतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची तयारी अंतिम टप्प्यात आहे. दरवर्षी गणेशोत्सवात मंडळांमध्ये लाखो भाविक गणरायाचे दर्शन घेण्यासाठी गर्दी करत असतात. मुंबईतील सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या किंग संर्कलच्या जी.एस.बी. गणपती सेवा मंडळाने यंदाच्या वर्षी तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढला आहे. मंडळात दर्शनासाठी होणारी गर्दी आणि बाप्पाच्या अंगावरील असलेले दागिने या सगळ्यांचा विचार करून सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळाने हे पाऊल उचललं आहे. 


पाच दिवस विराजमान होणाऱ्या या जीएसबी गणपती मंडळाचे यंदाचे 69 वे वर्ष आहे. जीएसबी महागणपती हा सर्वात श्रीमंत गणपती म्हणून ओळखला जातो. तसेच त्याच्या भक्तांमध्ये नवसाला पावणारा विश्वाचा राजा म्हणून प्रसिद्ध आहे. त्यामुळे या गणपतीच्या दर्शनाला दरवर्षी भाविकांची गर्दी वाढत आहे. ही बाब लक्षात घेऊन मंडळाने यंदा तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढला आहे.


दरवर्षी लाखो भाविक जीएस बी सेवा मंडळ, किंग सर्कल येथे बाप्पाच्या दर्शनासाठी येत असतात. भाविकांची गर्दी, बाप्पावर असलेल्या दागिने आणि सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मंडळाच्या वतीने योग्य खबरदारी घेत योग्य पाऊले उचलली जातात.


जीएसबी गणपतीला अर्पण दागिने


विश्वाचा राजा म्हणून प्रसिद्ध असलेला हा महाराजा नवसाला पावल्याने आणि श्रद्धेने भाविक त्याच्या चरणी दागिने अर्पण करतो. जी.एस. सेवा मंडळ, किंग सर्कल येथील बाप्पाला तब्बल 65 किलो हून अधिक सोन्याचे दागिने आणि 295 किलोपेक्षा अधिक चांदीचे दागिने या बाप्पाला भाविकांनी आणि सेवादारांनी अर्पण केले आहेत.


दरवर्षी मंडळाच्या वतीने काढण्यात येणाऱ्या विम्याचे सर्व विक्रम यंदा मोडीत काढले आहेत. यंदा तब्बल 360 कोटी 40 लाखांचा विमा काढण्यात आला आहे. यामध्ये बाप्पाचे दागिने, भाविक, सेवेकरी, अग्निशमनसह विविध सेवांचा समावेश आहे. यापूर्वी 2022 साली 316 कोटींचा विमा मंडळाच्या वतीने काढण्यात आला होता.


विम्याची माहिती


- सोने, चांदीचे दागिने -38.47 कोटी
- आग आणि भूकंपासह फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, भांडी, किराणा, – 2 कोटी
- डप, स्टेडियम, भक्त – 30 कोटी
- स्वयंसेवक, स्वयंपाकी, गाड्या, चप्पल स्टॉल कामगार, सुरक्षारक्षक – 289.50 कोटी
- परिसर – 43 लाख


गेल्यावर्षी गणेोशोत्सव काळात लाऊड स्पिकरसाठी तीन दिवसाची परवानगी होती. यंदा त्यात वाढ करून चार दिवस रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकर लावता येणार असल्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. 


ही बातमी वाचा: