Mumbai Fire Update : अहमदनगरमध्ये आयसीयू विभागात लागलेल्या भीषण आगीl 11 जणांचा मृत्यू झाला. अशातच काल मुंबईतही आगीची आणखी एक घटना घडली. या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. तर 7 जणांना सुखरुप वाचवण्यात यश आलं आहे. 


मुंबईतल्या कांदिवलीत रघुवंशी हेरिटेज या रहिवाशी इमारतीला मोठी आग लागली होती. आगीचं वृत्त कळताच आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सात गाड्या आग विझवण्यासाठी सध्या घटनास्थळी हजर झाल्या होत्या. दरम्यान, आता आग आटोक्यात आली असून या आगीत दोन महिलांचा होरपळून मृत्यू झाला आहे. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणकर यांनी कांदिवलीत आग लागलेल्या हंसा हेरिटेज इमारतीची पाहणी केली. यावेळी त्यांनी या संपूर्ण घटनेची माहिती घेऊन योग्य ती कारवाई करण्याच्या सूचना दिल्या आहेत. 


मुंबईत कांदिवली भागात हंसा हेरिटेज या रहिवाशी इमारतीला लागलेली आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे. या आगीमुळं इमारतीत अडकलेल्या 7 जणांना सुखरुप बाहेर काढण्यात आलं. या दुर्घटनेत दोन महिलांचा मृत्यू झाला. रात्री साडेआठच्या सुमारास पंधरा मजल्याच्या इमरतीच्या 14 व्या मजल्यावर ही आग लागली होती. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर देखील आगीची माहिती मिळताच तातडीनं घटनास्थळी पोहोचल्या होत्या. दरम्यान, आगीचं कारण अद्याप कळू शकलेलं नाही.  


कांदीवली पश्चिम भागात मथुरादास मार्गावरील हंसा हेरिटेज ही 15 मजल्यांची इमारत आहे. या इमारतीच्या चौदाव्या मजल्यावर आग लागली होती. दिवाळीनिमित्त लावलेल्या पणतीमुळे पडद्यानं पेट घेतला आणि त्यामुळेच आग लागली असल्याची माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. 


कांदिवली पश्चिम येथील मथुरादास रोडवर हंसा हेरिटेज ही पंधरा मजल्याची इमारत असून चौदाव्या मजल्यावर ही आग लागली. दिवाळीसाठी लावलेल्या पणतीमुळे घराच्या पडद्याने पेट घेतला. त्यातून ही आग वाढत गेली अशी माहिती स्थानिक रहिवाशांनी दिली आहे. इमारतीच्या खिडक्यांमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत होत्या. या आगीत दोन जण गंभीर जखमी झाले होते. त्यांना तात्काळ रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं होतं. परंतु, उपचारा दरम्यान, त्यांचा मृत्यू झाला. 


महत्त्वाच्या इतर बातम्या :