Mumbai Fire News : घाटकोपर रेल्वे स्थानकानजीक असलेल्या पारेख रूग्णालयाच्या बाजूच्या इमारतीला भीषण आग लागली आहे. या आगीत एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळत आहेत. पोरशी देढिया असे आगीत मृत्यू झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. तर आणखी दोघांची प्रकृती गंभीर आहे.
रुग्णालयातील रुग्णांना धुराचा त्रास होऊ नये यामुळे त्यांना दुसऱ्या रूग्णालयात हलविण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमदलाच्या काही गाड्या घनास्थळी दाखल झाल्या असून आग विझवण्याचा प्रयत्न सुरू आहे.
मुंबईत आगीच्या घटना सतत घडत आहेत. परळ परिसरातील अविघ्न पार्क इमारतीला लागलेल्या आगीचे प्रकरण ताजे असतानाच आज घाटकोपर पूर्व येथील पारेख हॉस्पिटलच्या शेजारील इमारतीला आग लागल्याची घनटना समोर आलीय. ही आग देखील अद्याप अटोक्यात आलेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्यासाठी अथक प्रयत्न सुरू आहेत.
मुंबई अग्निशमन दलाने दिलेल्या माहितीनुसार आगीच्या घनेनंतर 22 जखमींना पारेख रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु श्वास घेण्यास त्रास होत असल्याने सर्वांना बाजूच्या राजेवाडी रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
मीटरमधील तांत्रिक बिघाडामुळे आग
घाटकोपर येथील पंतनगर परिसरात असलेल्या विश्वा ब्लॉग इमारतीला मीटरमध्ये झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे दुपारी दोन वाजता आग लागली. विश्वा ब्लॉग या इमारतीला लागलेल्या आगीमुळे शेजारीच असलेल्या पारेख रुग्णालयात मोठ्या प्रमाणात धुराचे लोड पसरले. यानंतर रुग्णालय प्रशासनाने 22 रुग्णांना शेजारीच असलेल्या रुग्णालयात उपचारासाठी तात्काळ हलवले.
पुण्यातील एअर फिल्टर कंपनीला भीषण आग
दरम्यान, पुण्यातील भीमा कोरेगाव परिसरात एअर फिल्टर कंपनीला देखील भीषण आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्याची माहिती पुणे अग्निशमन विभागाने दिली आहे. या आगीत दोन कर्मचारी जखमी झाले आहेत.
महत्वाच्या बातम्या