Sanjay Raut : महाविकास आघाडीच्या महामोर्चाला (Maha Vikas Aghadi) सुरुवात झाली आहे. या मोर्चाला मोठा प्रतिसाद असल्याचे पाहायला मिळत आहे. शिवसेना खासदार संजय राऊत (Sanjay Raut) हे देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. हा मोर्चा म्हणजे आंदोलनाची पहिली ठिणगी आहे. यातून वणवा पेटल्याशिवाय राहणार नसल्याचा इशारा संजय राऊतांनी दिला आहे. आजचा मोर्चा हा महाराष्ट्रप्रेमींचा मोर्चा आहे. या मोर्चात सगळ्यांनी सामील होणं गरजेचं होतं. यामध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी देखील सामील होणं गरजेचं होत असेही राऊत म्हणाले.


मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी मोर्चात सामील होणं गरजेचं होतं


महाराष्ट्रात अशा प्रकारचे सरकार कधी आलं नव्हतं, असे म्हणत संजय राऊतांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. आजचा मोर्चा हा महाराष्ट्र प्रेमींचा आहे. यामध्ये सर्वांनी सामील होणं गरजेचं होत असेही राऊत म्हणाले. आजच्या मोर्चात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांनी देखील सामील होणं गरजेचं असल्याचे संजय राऊत म्हणाले. तसेच राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सुद्धा त्यांच्या 40 आमदारांसह सामील होणं गरजेचं होत असे संजय राऊत यावेळी म्हणाले. महाराष्ट्राच्या स्वाभिमानासाठी हा मोर्चा असल्याचं राऊतांनी सांगितले.


विविध मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक


राज्यपाल भगतसिंह कोशारी यांच्यासह भाजपच्या काही नेत्यांनी महापुरुषांबाबत केलेली वादग्रस्त वक्तव्य. तसेच कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांची महाराष्ट्र विरोधी वक्तव्य, सीमा भागात राहणाऱ्या गावांचे इतर राज्यांमध्ये समाविष्ट करण्याचे कट कारस्थान. राज्यातील बेरोजगारी, सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांचे महिला तसेच इतर नेत्यांबाबत बेताल वक्तव्य. महाराष्ट्रातील उद्योग इतर राज्यामध्ये गेल्याच्या मुद्यावरुन महाविकास आघाडी आक्रमक झाली आहे. याच मुद्यावरुन आज महाविकास आघाडीच्या वतीनं हा महामोर्चा काढण्यात येत आहे. या मोर्चात समविचारी पक्ष देखील सामील झाले आहेत. 


उद्धव ठाकरेंसह रश्मी ठाकरे मोर्चात सहभागी


शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे हे देखील मोर्चात सहभागी झाले आहेत. त्यांच्याबरोबर काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, बाळासाहेब थोरात, विरोधी पक्षनेते अजित पवार, संजय राऊत सहभागी झाले आहेत. या मोर्चात उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या देखील सहभागी झाल्या आहेत. दरम्यानस या मोर्चाला चांगला प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अनेक जिल्ह्यांमधून विविध पक्षांचे कार्यकर्ते या मोर्चात सहभागी होण्यासाठी आले आहेत. यावेळी कार्यकर्ते घोषमाबाजी करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. काँग्रेस, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेससह इतर समविचारी पक्षांचे कार्यकर्ते देखील या मोर्चात सहभागी झाले आहेत. 


महत्त्वाच्या बातम्या:


MVA Mumbai Morcha : आज मुंबईत महाविकास आघाडीचा महामोर्चा, तिन्ही पक्षांकडून शक्तीप्रदर्शनाची जोरदार तयारी