Dadar Fire : दादर पूर्व (Dadar East) भागातील एका रहिवासी इमारतीत आग (Building Fire) लागल्याची घटना घडली. गुरुवारी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास ही आग लागली होती. या इमारतीच्या 42 व्या मजल्यावर ही आग लागली होती. अग्निशमन दलाच्या (Fire Brigade) अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश (Success in Getting The Fire Under Control) मिळालं आहे. आग लागल्याची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होते. त्यानंतर चार तासाहून अधिक वेळानंतर आग अटोक्यात आली आहे. शॉर्टसर्किट होऊन आग लागल्याची माहिती मिळत आहे. 


दादर पूर्व भागात आर. ए. रेसिडन्सी या रहिवासी इमारतीला आग लागली होती. 42 व्या मजल्यावर आग लागली होती. या इमारतीची लिफ्ट बंद असल्याने अग्निशमन दलाच्या जवानांना पायऱ्यांचा वापर करावा लागला. त्यामुळं आग विझवण्यात अडथळा निर्माण होत होता.


दरम्यान, ज्या भागातील इमारतीला आग लागली, त्या इमारतीत अग्निशामक यंत्रणा काम करत नव्हती. त्यामुळं आगीवर तत्काळ नियंत्रण मिळवता आलं नाही. कारण आग विझवण्यासाठी 16 फायर इंजिन, 4 जंबो टँकर आणि 1 क्रेन दाखल झाले होते. अखेर आग विझवण्यात अग्निशमन दलाला यश आलं आहे.


काही दिवसापूर्वीच वन अविघ्न पार्कला लागली होती आग


काही दिवसापूर्वीच लालबागमधील (Lalbagh News) टोलेजंग इमारत वन अविघ्न पार्कला (One Avighna Park) आग लागील होती. त्या ठिकाणी देखील अग्निशामक दलाची यंत्रणा बंद होती. त्यामुळं आग अटोक्यात आणण्यात उशीर लागला. अग्निशामक दलाला फायर वनचा कॉल देण्यात आला होता. त्यानंतर अग्निशमन दलानं तात्काळ घटनास्थळी धाव घेत आग आटोक्यात आणण्यासाठी शर्थीचे प्रयत्न केले. अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या होत्या. शर्थीच्या प्रयत्नांनंतर आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशामक दलाला यश आलं होतं. वन अविघ्न ही मुंबईतील लालबाग ((Lalbagh Fire News) परिसारातील गगनचुंबी इमारत आहे. ही इमारत एकूण 60 मजल्यांची आहे. तर इमारतीच्या आजूबाजूला इतर लहान-मोठ्या इमारतीही आहेत. त्याशिवाय अनेक बैठी घरं, चाळीही आहेत. मध्य रेल्वेवरील करी रोड स्टेशनच्या (Currey Road Railway Station) अगदी बाजूलाच ही इमारत आहे. तसेच या भीषण आगीत अनेक नागरिक अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या:


Aurangabad News : औरंगाबादेत लागलेल्या आगीत पाच दुकाने जळून खाक, अग्निशमन दलाच्या मदतीने आगीवर नियंत्रण