Mumbai News : मुंबईमध्ये फॅशनसाठी प्रसिद्ध असलेल्या फॅशन स्ट्रीटला आग लागल्याची धक्कादायक घटना घडली आहे. दुपारी लागलेल्या या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवानांना यश आलं आहे. मात्र, या आगीमध्ये तब्बल 20 ते 22 कपड्यांची दुकानं जळून खाक झाली आहेत. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याची ही प्राथमिक माहिती आहे
मुंबईतील चर्चगेट स्टेशनजवळील फॅशन स्ट्रीट हे कपड्यांसाठी विशेष प्रसिद्ध मार्केट आहे. या ठिकाणी आज दुपारी 1 च्या सुमारास मोठी आग लागली होती. या आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या. जवळपास तासाभराच्या प्रयत्नानंतर या आगीवर नियंत्रण मिळविण्यात अग्निशमन दलाच्या जवांनाना यश आलं आहे. दरम्यान, या आगीत तब्बल 20 ते 22 कपड्यांची दुकानं पूर्णपणे जळून खाक झाली आहेत. त्यामुळे हातावरती पोट असलेल्या कापड व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. डोळ्यांदेखत दुकानं जळताना पाहुन अनेक कापड व्यावसायिकांच्या डोळ्यांमध्ये अश्रू पाहायला मिळाले. ही आग शॉर्ट सर्किटमुळे झाली असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. मात्र, असे असले तरी सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. परंतु, या आगीमुळे कापड व्यावसायिकांचं मोठं नुकसान झालं आहे. या आगीमुळे मुंबईतील क्रॉस मैदानावर सुरु असलेल्या एमसीएच्या पुरुषोत्तम ढाल क्रिकेट स्पर्धेचे सामनेसुद्धा काही काळासाठी थांबविण्यात आले आहेत.
पाहा व्हिडीओ :
फॅशनच्या कपड्यांसाठी विशेष प्रसिद्ध ठिकाण :
विविध प्रकारच्या कपड्यांची खरेदी करण्यासाठी प्रसिद्ध असलेलं मुंबईतील फॅशन स्ट्रीट ही फार मोठी बाजारपेठ आहे. या ठिकाणी अनेक ठिकाणाहून लोक विविध कपड्यांची, फूटवेअरची तसेच उतर वस्तूंची खरेदी करण्यासाठी मुंबईत येतात. सकाळी 9 वाजल्यापासून ते रात्रीपर्यंत या ठिकाणी ग्राहकांच्या प्रचंड मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते.
महत्वाच्या बातम्या :
Mumbai Crime: अवैध मार्गाने मुंबईत घुसलेल्या तीन बांगलादेशींना अटक, तपास सुरु