Maharashtra Politics: राज्याच्या राजकारणात सातत्यानं काही ना काही अपडेट्स समोर येत आहेत. आता मध्यावधी निवडणुकांची शक्यता उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray)  यांनी संपर्कप्रमुखांच्या बैठकीत वर्तवली आहे. उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्ते आणि नेत्यांना निडवणुकीच्या तयारीला लागण्याचे आदेश या बैठकीत दिले आहेत. यावर मुंबई भाजपचे अध्यक्ष आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. शेलार यांनी एबीपी माझा कट्ट्यावर बोलताना म्हटलं आहे की, आमदार फुटू नये म्हणून उद्धव ठाकरेंची मध्यावधीची भाषा बोलत आहेत. स्वत:च्या गेलेल्या लोकांचा आरोप काय आहे, त्यावर उद्धव ठाकरे काय बोलले का? असा सवाल शेलार यांनी केला आहे.


शेलार यांनी म्हटलं की, स्वत:चे मंत्री, आमदार, सदस्य त्यांची सत्ता असताना गेले. सगळ्या यंत्रणा तुमच्याकडे होत्या, तुम्ही मुख्यमंत्री होतात, तरी ते गेले. मतदानही त्यांनी विरोधात केलं, तुमच्याशी ते बोलले सुद्धा. त्यांच्या आरोप आहे की, शिवसेना दुबळी केली जातेय, बाळासाहेबांच्या विचारांपासून भरकटतेय, राष्ट्रवादी आमच्याशी राजकारण करतेय. या सर्व प्रश्नांना बगल द्यायची आणि भावनात्मक मुद्द्यांवर उरलेल्या शिवसैनिकांना टिकवण्यासाठी गद्दारीचं गाजर द्यायचं, असा टोलाही त्यांनी लगावला. 


शेलांरांनी म्हटलं की, ठाकरेंकडून आज  राहिलेले जे काही आहेत त्यांना हे सांगितलं जातंय की, आपण एकनाथजींबरोबर येऊ. मुंबईतील खासदारांच्या सुपुत्रांना असं सांगितलं, असा दावाही त्यांनी केला. जाणारे व्यक्ती सांगून जात आहेत की उद्धवजी हे चुकतंय. अखिल भारतात एकमेव पक्ष आणि नेते आहेत उद्धवजी, त्यांचे निर्णय योग्य असतात, इतक्या अहंकारात ते आहेत, असा टोलाही आशिष शेलारांनी लगावला आहे. पुढील अडीच वर्ष आणि त्यापुढेही हे सरकार राहील, असंही शेलार म्हणाले. 


 शेलार यांच्याशी संपूर्ण गप्पांचा कट्टा आज रात्री 9 वाजता


आशिष शेलार यांच्याशी संपूर्ण गप्पांचा कट्टा आज रात्री 9 वाजता आपण एबीपी माझावर पाहू शकणार आहात. यामध्ये आशिष शेलार यांनी मुंबई महापालिका, राज्याचं राजकारण यासह विविध विषयांवर भाष्य केलं आहे.  राज्यात शिवसेना आणि भाजपमधला संघर्ष जेव्हा जेव्हा उफाळून आला, तेव्हा तेव्हा शिवसेनेला चोख प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपचे जे शिलेदार पुढे आले, त्यातला प्रमुख चेहरा म्हणून आशिष शेलार नेहमीच समोर असल्याचं दिसून आलं आहे.  आता पुन्हा एकदा मुंबई महापालिकेची निवडणूक टप्प्यात आली आहे. भाजपकडून या निवडणुकीची धुरा शेलारांच्या खांद्यावर आहे. पार्टी विथ डिफरन्स असं म्हणणारे, या निवडणुकीत काही बदल घडवणार का? बीएमसीमध्येही करेक्ट कार्यक्रम होणार का? यासोबत राज्याशी संबंधित इतरही विषयांवर बोलण्यासाठी आशिष शेलार आज माझा कट्ट्यावर आले आहेत. 


ही बातमी देखील वाचा


Uddhav thackeray : राज्यात मध्यावधी निवडणुकांची शक्यता, उद्धव ठाकरेंचं वक्तव्य