मुंबई : माजी राज्यसभा खासदार शिवाजीराव गिरधर पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव पाटील 92 वर्षांचे होते.
शिवाजीराव गिरधर पाटील यांची आणखी एक ओळख म्हणजे ते दिवंगत अभिनेत्री स्मिता पाटील यांचे वडील होते.
काँग्रेस सत्तेत असताना शिवाजीरावांनी 12 वर्ष मंत्रीपदही भूषवलं होतं. सात वर्ष ते महाराष्ट्राच्या विधानपरिषदेत (1960 ls 1967) तर 13 वर्ष विधानसभेत (1967 ते 1980) आमदार म्हणून निवडून आले. 1992 ते 1998 या काळात त्यांनी राज्यसभेत खासदारकी भूषवली. ते ऑल इंडिया स्टुडंन्ट्स फेडरेशनचे अध्यक्षही होते.
शिवाजीराव पाटील यांच्या निधनानं राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.
माजी राज्यसभा खासदार शिवाजीराव गिरधर पाटील कालवश
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
22 Jul 2017 06:33 PM (IST)
माजी राज्यसभा खासदार शिवाजीराव गिरधर पाटील यांचं वृद्धापकाळानं निधन झालं. मुंबईतल्या लीलावती हॉस्पिटलमध्ये शनिवारी पहाटे त्यांनी अखेरचा श्वास घेतला. शिवाजीराव पाटील 92 वर्षांचे होते.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -