मुंबई : राज्याचं व्हिजन ठरवण्याऐवजी मुख्यमंत्री निवडणुकांच्या राजकारणात मश्गुल आहेत, अशी टिका शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी केली आहे. एबीपी माझाच्या 'व्हिजन पुढच्या दशकाचं' या विशेष कार्यक्रमात संजय राऊत बोलत होते.


प्रगतीशील महाराष्ट्राला आणखी मोठ्या उंचीवर नेण्यासाठी लोकशाहीचा गाडा हाकणाऱ्या दिग्गजांच्या मनात नेमकं काय चाललं आहे?, दिग्गजांच्या विकासाचं व्हिजन नेमकं काय आहे? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या विकासाच्या नेमक्या काय कल्पना आहेत? हे जाणून घेण्याचा दरवर्षीप्रमाणे यंदाही 'एबीपी माझा'ने प्रयत्न केला आहे.

"आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, पण टीका करणारे घरातच असावेत, असं संजय राऊत म्हणाले. सामान्य लोकांसाठी शिवसेना सरकारवर टीका करते. बाळासाहेबांचा युती सरकारवरही वचक होता," असंही राऊत यांनी सांगितलं:

संजय राऊत म्हणाले की, "दुर्दैवाने आज महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य नाही. इतर राज्याचे मुख्यमंत्री इथले उद्योग त्यांच्याकडे नेत आहेत. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सजग राहायला हवं. निवडणूक जिंकण्यासाठी सरकार चालवायचं नसतं, आपले मुख्यमंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत."

शिवसेना खासदार संजय राऊत याचं व्हिजन

येत्या दहा वर्षात महाराष्ट्रात शिवसेनेची एकहाती सत्ता असेल आणि उद्धव ठाकरेंकडे नेतृत्त्व असेल : संजय राऊत

अदृश्य हात दोन्ही बाजूला असतात, सत्ताधारी आणि विरोधकांकडेही असतात: संजय राऊत

मुख्यमंत्र्यांनी माजी मुख्यमंत्र्यांचा अभ्यास करावा : संजय राऊत

राजकीय अस्थिरतेमुळे राज्यातील संपाचे प्रकार वाढले : संजय राऊत

निवडणूक जिंकण्यासाठी सरकार चालवायचं नसतं, आपले मुख्यमंत्री निवडणुकीच्या कार्यक्रमात व्यस्त आहेत : संजय राऊत

इतर राज्याचे मुख्यमंत्री इथले उद्योग त्यांच्याकडे नेत आहेत, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी सजग राहायला हवं : संजय राऊत

दुर्दैवाने आज महाराष्ट्र क्रमांक एकचं राज्य नाही : संजय राऊत

सामान्य लोकांसाठी शिवसेनेची सरकारवर टीका, बाळासाहेबांचा युती सरकारवरही वचक होता : संजय राऊत

आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी, पण टीका करणारे घरातच असावेत : संजय राऊत