भरधाव जाणारी इनोव्हा गाडी नियंत्रण गेल्यानं रोड डिव्हायडर पार करुन पलिकडच्या रस्त्यावर गेली. त्यावेळी समोरच्या दिशेने येणाऱ्या चार गाड्यांना इनोव्हाची धडक बसली.
अपघातग्रस्त गाड्या हटवल्या असल्या तरी यामुळे घाटकोपरहून दक्षिण मुंबईकडे जाणारी वाहतूकही विस्कळीत झाली आहे. चेंबूर ते वडाळा दरम्यान हा अपघात झालाय. यामुळे ऐन कामाच्या वेळी वाहतूक अत्यंत धीम्या गतीनं सुरु आहे.
दुसरीकडे कुर्ला-वाकोला या मार्गावरील बेस्टची बस बंद पडल्यानं एससीएलआरवरही वाहतुकीवर परिणाम झाला आहे.
पावसामुळे रेल्वेचा खोळंबा
कुर्ल्याजवळ सिग्नल बिघाडामुळे मध्य आणि हार्बर रेल्वेची वाहतूक 20-25 मिनिटं उशिरानं सुरु आहे. सिग्नल बिघाड दुरुस्त झाल्यानंतरही हार्बरची अप आणि डाऊन मार्गावरील वाहतूक उशिरानं धावत आहे. मध्य रेल्वेच्या वाहतुकीवरही परिणाम झाला असून मुंबईकडे जाणारी वाहतूक उशिरानं सुरु आहे.