एक्स्प्लोर

मुंबईच्या डंपिंग ग्राऊंडसाठी दोन महिन्यांत जागा उपलब्ध करा : हायकोर्ट

राज्य सरकारनं आपली जबाबदारी ओळखून तात्काळ या दोन्ही जागा अथवा अन्य पर्यायी जागा डंपिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश हायकोर्टानं दिलेत.

मुंबई : घनकचरा व्यवस्थापनाची जबाबदारी मुंबई महानगरपालिकेची असली तरी, डंपिंग ग्राऊंडसाठी जागा उपलब्ध करून देण ही राज्य सरकारची जबाबदारी आहे. असं स्पष्ट मत शुक्रवारी हायकोर्टानं व्यक्त केलंय. त्यामुळे मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासाठी येत्या दोन महिन्यांत जागा उपलब्ध करून द्या असे निर्देश मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारला दिलेत. ऑक्टोबर 2018 पर्यंत महापालिकेला देवनार डंपिंग ग्राऊंडवर घनकच-याची विल्हेवाट लावण्याची परवानगी दिली आहे. न्यायमूर्ती अभय ओक आणि न्यायमूर्ती रियाझ छागला यांच्या खंडपीठानं हे आदेश दिलेत. सामाजिक कार्यकर्ता पांडुरंग पाटील यांनी मुंबईतील घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात हायकोर्टात जनहित याचिका दाखल केली आहे. मुंबईत डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागाच उपलब्ध नाही आहे. तर डंपिंग ग्राऊंडची कार्यक्षमता संपल्यानंतरही मुलूंड आणि देवनार इथं कचरा टाकण्यास वारंवार मुदत वाढ देण्यात आलीय. डंपिंग ग्राऊंडसाठी पर्यायी जागा म्हणून मुलूंडमधील मिठागराची जागा आणि अंबरनाथमधील करवले येथील जागेचा पर्याय राज्य सरकारनं पालिकेकडे पाठवला होता. मात्र अंबरनाथमध्ये मोठ्या प्रमाणात अतिक्रमणं आहेत तर मुलूंडमधील मिठागराची जागा हस्तगत करण्यासाठी कायदेशीर बाबींची पूर्तता करणंही आवश्यक आहे. त्यामुळे पालिकेनं या पर्यायी जागांवर घनकचरा व्यवस्थापनाचे प्रकल्प सुरू करण्यात असमर्थता व्यक्त केली होती. त्यामुळे राज्य सरकारनं आपली जबाबदारी ओळखून तात्काळ या दोन्ही जागा अथवा अन्य पर्यायी जागा डंपिंग ग्राऊंडसाठी उपलब्ध करून द्याव्यात असे निर्देश हायकोर्टानं दिलेत. घनकचरा व्यवस्थापनाच्याच मुद्यावरून हायकोर्टानं मुंबईतील नवीन बांधकामाला बंदी घातली होती. त्यानंतर सर्वोच्च न्यायालयानं याला स्थगिती देत सहा महिन्यांकरता नवीन बांधकामांना सशर्त परवानगी दिली होती. या परवानगीची मुदत पुढील महिन्यात संपत आहे. त्यामुळे मुंबई उच्च न्यायालयाचे हे आदेश सर्वोच्च न्यायालयापुढेही ठेवण्यात यावेत असे निर्देश पालिकेला देण्यात आलेत.

महत्त्वाच्या बातम्या

Raju Patil : मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
मी 100 टक्के आमदार होणार! राजू पाटलांचं मोठं वक्तव्य, राजकीय वर्तुळात खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
ठाकरेंचे 14 आमदार एकनाथ शिंदेंच्या संपर्कात, लवकरच ऑपरेशन टायगर-4 होणार, शिवसेना आमदाराच्या दाव्यानं खळबळ
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा
डीजे वाजणारच! तो बंद करुन दाखवाच, गुणरत्न सदावर्तेंचं राज ठाकरेंना आव्हान, म्हणाले, कोणाला त्रास होत असेल तर मला कॉल करा

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Video: अन् महिंद्रा स्कॉर्पिओ मालकानं थेट बंगल्याच्या दुसऱ्या मजल्यावर क्रेनने उचलून पार्क केली! कारण ऐकून डोक्याला हात लावायची पाळी
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Gold : बँकेत तारण ठेवलेलं सोनं चोरीला गेल्यास किती भरपाई मिळते? व्याज मिळतं का? जाणून घ्या 
Dahihandi 2026 : सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
सांगवीतील दहीहंडी उत्सवात लोखंडी स्ट्रक्चर कोसळून महिलेचा मृत्यू; पोलिसांकडून मंडळाच्या अध्यक्षावर गुन्हा, तर दोघांना अटक
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
मजुरांचा प्रामाणिकपणा, खोदकाम करताना सापडलेली 14 सोन्याची नाणी ग्रामपंचायतीकडं दिली; नाण्यांवर हत्तीचं चित्र
Pakistan Cricket : भारताला वर्ल्ड कपमध्ये 10 विकेटनं पराभूत करताच पाकिस्तान क्रिकेटची बर्बादी सुरु,पाकच्या माजी क्रिकेटपटूनं धक्कादायक वास्तव मांडलं 
भारतावर वर्ल्ड कपमध्ये विजय मिळवल्यानंतर पाकिस्तान क्रिकेटची वाट लागली, पाकच्या माजी क्रिकेटपटूचा धक्कादायक दावा
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
राज ठाकरेंच्या मताशी पुतण्या सहमत; गणेशोत्सावत दंगल वक्तव्यामागचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं राज'कारण'
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
'जम्मू आणि काश्मीर, लडाख आमच्या नकाशाप्रमाणेच दिसले पाहिजे, आमच्या सीमा पक्क्या आहेत' नव्या जागतिक नकाशावर भारताचा आक्षेप
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
अंगणवाडीतील निकृष्ट आहाराची तक्रार केली, वरिष्ठांकडून मानिसक छळ; अखेर अंगणवाडी मदतनीसचा राजीनामा
Embed widget