एक्स्प्लोर
हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर
![हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर Mumbai Doctors Mass Leave Continue हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही मुंबईतील डॉक्टर रजेवर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2017/03/20052854/Mard-doctors-protest.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतरही मुंबईतील डॉक्टरांची सामूहिक रचा सुरुच आहे. हायकोर्टाच्या ताशेऱ्यानंतरही कामबंद करणाऱ्या डॉक्टरांवर कारवाई होण्याची शक्यता आहे.
तर दुसरीकडे पुण्याच्या ससून रुग्णालयातील 150 निवासी डॉक्टर रुजू झाल्याची माहिती डीन डॉ. अजय चंदनवाले यांनी दिली आहे. कामावर रुजू व्हा, अन्यथा कारवाई करु, अशी नोटीस ससूनचे डीन डॉ. अजय चंदनवाले यांनी बजावली होती.
न्यायालयाने डॉक्टरांना खडसावलं
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा, अशा शब्दात मुंबई उच्च न्यायालयाने संपकरी निवासी डॉक्टरांना फटकारलं. एखाद्या कामगाराप्रमाणे आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी जर डॉक्टर संपाचं हत्यार उपसत असेल तर त्यांचं वर्तन हे डॉक्टरी पेशाला काळीमा फासणारं आहे, असं निरीक्षण मुख्य न्यायमूर्ती मंजुळा चिल्लोळ यांनी नोंदवलं.
काय आहे प्रकरण?
सायन रुग्णालयातील डॉक्टर रोहित कुमार यांना रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईकाडून मारहाण करण्यात आली. रविवारी संध्याकाळी हा प्रकार घडला. याप्रकरणी सायन पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
या घटनेचा निषेध म्हणून रविवार संध्याकाळपासून सायनसह नायर आणि केईएम रुग्णालयातील रुग्णसेवा बंद आहे. या रुग्णालयात सध्या केवळ अत्यावश्यक सेवा सुरु आहे.
आज सकाळपासून राज्यभरातल्या सर्व निवासी डॉक्टरांनी बंद पुकारल्यानं रुग्णसेवा ठप्प पडली आहे.
मार्डच्या डॉक्टरांच्या नेमक्या मागण्या काय?
– डॉक्टरांवरील हल्ले टळण्यासाठी डॉक्टर्स प्रोटेक्शन अॅक्ट 2010ची परिणामकारक अंमलबजावणी करा
– डॉक्टरांना मारहाण करणाऱ्यांवर तात्काळ कारवाई करावी
– निवासी डॉक्टरांना सुरक्षित वातावरणात काम करता यावे यासाठी सुरक्षा रक्षकांची संख्या वाढवा
– सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरे लावा
संबंधित बातम्या
मारहाणीची भीती वाटत असेल तर नोकरी सोडा : हायकोर्ट
डॉक्टरांच्या सामूहिक रजेचा दुसरा दिवस, संपाविरोधात हायकोर्टात सुनावणी
राज्यभरातील डॉक्टर रजेवर, रुग्णांचे हाल
सायन रुग्णालयात रुग्णाच्या नातेवाईकांची निवासी डॉक्टरला मारहाण
औरंगाबादच्या घाटी रुग्णालयात डॉक्टरला मारहाण
धुळ्याच्या मारहाणीविरोधातला निवासी डॉक्टरांचा संप मागे
इंजिनिअरच व्हायला हवं होतं, धुळ्याच्या ‘त्या’ डॉक्टरची हतबलता
धुळे डॉक्टर मारहाण : संशयित आरोपीचा पोलिस कोठडीत गळफास
धुळ्यात जबर मारहाणीत डॉक्टरचा डोळा निकामी होण्याची भीती
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
बातम्या
क्राईम
बॉलीवूड
नाशिक
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)