एक्स्प्लोर

चोरासोबत झटापट, ठाण्यात लोकलखाली येऊन महिलेचा मृत्यू; तीन मुलींचं छत्र हरपलं

लोकलमधून मोबाईल घेऊन पळ काढणाऱ्या चोराचा पाठलाग करताना महिलेचा लोकलखाली येऊन दुर्दैवी मृत्यू झाला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. विद्या यांच्या जाण्यामुळे त्यांच्या तीन मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे.

मुंबई : मोबाईल चोराशी झटापट करताना लोकलमधून पडून महिलेचा मृत्यू झालाय. कळवा रेल्वे स्थानकात लोकल खाली आल्यामुळे या महिलेला जीव गमवावा लागला आहे. विद्या पाटील असं या महिलेचं नाव आहे. त्या शनिवारी संध्याकाळी लोकलनं प्रवास करत होत्या. त्याचवेळी लोकलच्या महिला डब्ब्यातून केवळ पाच महिला प्रवास करत होत्या. कळवा रेल्वे स्थानकातून लोकल मार्गस्थ होत असतानाच एका चोरट्यानं लोकलमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यानं विद्या यांच्या हातातून मोबाईल घेत पळ काढला. तेवढ्यात चोरट्याला प्रतिकार करण्याच्या प्रयत्नात त्या लोकलमधून खाली उतरल्या, मात्र तोवर प्लॅटफॉर्म संपला आणि रेल्वेखाली आल्यानं त्यांचा मृत्यू झाला. 

विद्या पाटील यांच्या पश्चात पती आणि तीन लहान मुली असा परिवार आहे. चोराने विद्या पाटील यांच्या हातातील मोबाईल खेचला. विद्या यांनी त्याला प्रतिकारही केला. या झटापटीमध्ये चोरट्याने त्यांना धक्का दिला. या झटापटील त्यांचा तोल गेला. त्या प्लॅटफॉर्मवर उतरल्याही पण तेवढ्यात प्लॅटफॉर्म संपला आणि चोरासोबतच्या झटापटीत विद्या पाटील यांचा दुर्दैवी मृत्यू झाला. त्यांच्या जाण्यानं त्यांच्या मुलींच्या डोक्यावरील मायेचं छत्र हरपलं आहे. शनिवारी संध्याकाळी ही घटना घडल्याची माहिती रेल्वे पोलिसांनी दिली आहे. 

लॉकडाऊन असताना चोरटा लोकलमध्ये आलाच कसा? 

पोलिसांनी याप्रकरणी आरोपीला मुंब्रा येथून अटक केली आहे. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे राज्यात कडक निर्बंधांसह लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. अशातच मुंबईची लाईफलाईन म्हणून ओळखली जाणाऱ्या मुंबई लोकलमधून सर्वसामान्यांना लोकलमधून प्रवेश करण्यास मनाई करण्यात आली आहे. केवळ अत्यावश्यक सेवांमध्ये काम करणाऱ्यांना लोकलमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली नसतानाही चोरटा लोकलमध्ये आलाच कसा असा संतप्त सवाल नागरिकांकडून विचारला जात आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
Virar Crime News: पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
पोक्सो गुन्ह्यात अडकवण्याची धमकी, मागितली 5 लाखांची खंडणी; रेल्वे कर्मचाऱ्याचा संशयास्पद मृत्यू
Bacchu Kadu on Eknath Shinde CM Post: महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
महाराष्ट्रात सर्व्हे केला तर एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रि‍पदासाठी जास्त पसंती, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Kalyan Railway station Crime: कल्याण रेल्वे स्थानकात ट्रेनची वाट पाहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार, नराधमाला पोलिसांकडून अटक
मोठी बातमी: कल्याण रेल्वे स्थानकात खळबळजनक घटना, नराधमाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचार

व्हिडीओ

Special Report Petrol Issue : इंधन टंचाईचा फटका, पेट्रोल पंपावर रांगा, पेट्रोलसाठी हाणामारी
Special Report Parth Pawar Meet Fadnavis : वर्षावर पार्थ भेटीमागचा अर्थ? देवेंद्र फडणवीस म्हणाले...
Amit Thackeray on NEET Paper Leak : अजून किती खालची पातळी गाठणार हे सरकार? अमित ठाकरेंची टीका
Bachchu Kadu on Eknath Shinde : अवघ्या महाराष्ट्राला शिंदे मुख्यमंत्री व्हावेत असं वाटतं, बच्चू कडूंच्या विधानानंतर भाजपचा पहिला पलटवार
Sambhajinagar : संभाजीनगरमध्ये गेल्या ८ वर्षापासून अभिनव उपक्रम; उद्योजक, विद्यार्थी करतात स्वच्छता

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Kerala : केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
केरळमध्ये यूडीएफ सरकारमध्ये मुख्यमंत्र्यांसह 21जणांचा शपथविधी, राज्यपालांकडे यादी सोपवली
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
अभिनेत्री उषा चव्हाण यांना एकनाथ शिंदेंचा फोन; पुण्यातील जमीन प्रकरणात दिलासा, तात्पुरती स्थगिती देण्याचे निर्देश
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
सीबीआयचे ट्युशन संचालकाच्या कार्यालयात छापे, NEET पेपरफुटीप्रकरणात लातूरमध्ये पुन्हा झाडाझडती; कागदपत्रे जप्त
Gopichand Padalkar : नरेंद्र मोदींचं आवाहन, चारचाकी वाहन सोडून गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा सांगलीच्या फेमस टांग्यातून पाच किलोमीटर प्रवास
मोदींची साद, भाजप नेत्यांचा प्रतिसाद, अलिशान वाहनांच्या ताफ्याला फाटा, गोपीचंद पडळकर-सदाभाऊ खोत यांचा टांग्यातून प्रवास
Donald Trump Threat to Iran : घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
घड्याळाची टिक टिक सुरु, हालचाल सुरु करा अन्यथा काहीच राहणार नाही, ट्रम्प यांची इराणला धमकी
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 17 मे 2026 | रविवार
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
भिवंडी-अहिल्यानगर बसचा भीषण अपघात, एसटीचा भुगाच; चालकासह एका प्रवाशाचा मृत्यू, 20 जण जखमी
Petrol Diesel : रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
रशियन तेल खरेदीची सूट अमेरिकेकडून रद्द, भारतात पेट्रोल आणि डिझेलचे दर पुन्हा वाढण्याचं संकट
Embed widget