मुंबई: मुंबईतून एक संतापजनक घटना समोर आली आहे. गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Mumbai crime News) करून तिच्यावरती निर्दयीपणे हल्ला केल्याची घटना समोर आली आहे. तरुणीवर बलात्कार करून तिच्यावर सिझेरियन ब्लेड आणि दगडांसह हल्ला करून तिला जखमी अवस्थेत सोडून हल्लेखोराने पळ काढल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. (Mumbai crime News)
या घटनेबाबत मिळालेल्या माहितीनुसार, एका अज्ञात रिक्षाचालकाने पीडितेवर हल्ला (Mumbai crime News) केल्याची माहिती मिळाली आहे. मुंबई पोलिसांकडून हल्लेखोराचा शोध घेण्यात आला आहे. पीडित तरूणी मुंबईतील (Mumbai crime News) राम मंदिर स्टेशनच्या आवारात बेशुद्ध अवस्थेत आढळली आहे. या पिडित तरूणीच्या गुप्तांगात काही दगडाचे तुकडेही घालण्यात आले होते(Mumbai crime News). गोरेगाव पूर्वेत वनराई पोलीस स्टेशनच्या हद्दीत ही घटना घडली आहे. याप्रकरणी वनराई पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपी रिक्षा चालकाला अटक केली आहे. पुढील तपास वनराई पोलीस करत आहे.
ही घटना समोर आल्यानंतर परिसरात खळबळ उडाली आहे. गोरेगाव पूर्व पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राम मंदिर स्टेशनजवळ एका 20 वर्षीय तरुणीवर बलात्कार (Mumbai crime News) करून तिच्यावरती निर्दयीपणे हल्ला केल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याचबरोबर एका अज्ञात रिक्षाचालकांने असे कृत्य केल्याची माहिती (Mumbai crime News) पोलिसांना मिळाली होती. तपास करत त्याला पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर घटनास्थळी जाऊन तरूणीला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं. ही तरूणी तिथे कशी आली, रिक्षाचालकाने तिला कोणत्या परिसरातून आणलं, नेमकं काय घडलं, याबाबतचा तपास पोलिस करत आहेत.
पिडीत तरूणीला उपचारांसाठी दाखल करण्यात आलं होतं. आता तरूणीची प्रकृती स्थिर असल्याची माहिती आहे. पोलिस घटनेचा संपूर्ण तपास करत आहेत, अद्याप या घटनेबाबत कोणतीही माहिती पोलिसांनी दिलेली नाही.