मुंबई : मुंबईकरांसाठी (Mumbai News) एक अतिशय महत्त्वाची बातमी आहे. मुंबईत सध्या मोलकरीण गँग सक्रिय झाली आहे. घरकाम करताना चोरी करणाऱ्या तीन महिलांना वांद्रे पोलिसांनी अटक केली आहे.. तिघींच्या घरून एकूण 50 लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. घरात कामं करताना त्या कपाट किंवा तिजोरीची डुप्लिकेट चावी बनवायच्या आणि मग काही दिवसांनी मोका साधून चोरी करत फरार व्हायच्या. ज्येष्ठ नागरिकांना टार्गेट करण्यावर त्यांचा अधिक भर असायचा.  


 घरकामाच्या नावाने घरात प्रवेश करून संधी मिळत चोऱ्या करत आहेत. नुकत्याच झालेल्या एक प्रकरणात मुंबईमधील बांद्रा पोलिसांनी तीन महिलांना अटक केली आहे. घरकाम करण्याच्या नावाखाली हे महिला घरात शिरतात आणि मग विश्वास संपादन करून चोरी करतात अशी ही घटना समोर आली आहे.  मुंबईतील ज्येष्ठ नागरिकांच्या घरी काम करायचं आणि मग चोरी करायची. त्या महिलांनी वांद्र्यातील एका ज्येष्ठ नागरिकाच्या घरी चोरी केल्यानंत झाल्यानंतर वांद्रे पोलिसांनी गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू करत या महिलांचा शोध सुरू केला. 


पोलिसांनी या तिन्ही महिलांकडून सोन्याचे दागिने किमंत  35, 93, 700 रूपये तसेच चार मनगटी घड्याळे किंमत 20,000 रुपये आणि रोख रक्कम 3,54,600  रुपये अशी एकूण 39, 68, 300  रूपयांची मालमत्ता हस्तगत करण्यात आली आहे. अटक महिला आरोपीत  निर्मला आप्पासाहेब कांबळे (36 वर्ष), गुलजार मकबुल शेख (40 वर्षे) अनिषा जानी शेख (45 वर्ष) आहे.


कशा करत होत्या चोरी? 



  •  घरकाम करण्याच्या नावाखाली घरात शिरायचं

  •  विश्वास संपादन करून घरातील मौल्यवान वस्तूंची माहिती काढायची 

  • मग घरातील लॉकर व दरवाजाची डुप्लिकेट चावी तयार करायची  आणि  संधी साधून चोरी करायच्या

  • बनावट चावीच्या मदतीने या महिलेने सोन्याच्या आणि हिऱ्याच्या दागिन्यांची चोरी केली 

  •  लाखो रुपयांची रोकड घेऊन झाल्या फरार


 वृद्धाचा खून करून घरात चोरी करणाऱ्या केअर टेकरला अटक


 मुंबईच्या सांताक्रुझ भागामध्ये  एका 85 वर्षाच्या वृद्ध माणसाची त्याच्या घरात काम करणाऱ्या केअर टेकरने हत्या केल्याची खळबळजनक घटना सोमवारी (8 मे) घडली होती. कृष्णा मनबहादूर पेरियार (30 वर्ष) असे अटक करण्यात आलेल्या केअर टेकर नोकराचं नाव आहे. हेल्थ केअर अ‍ॅट होम या प्लेसमेंट एजन्सीकडून नाईक दांपत्याने त्याला देखरेख करण्यासाठी नेमले होते. आठच दिवसापूर्वी हा नोकर म्हणून नाईक यांच्या घरी कामावर रुजू झाला होता.