मालाड : मालाडमध्ये केवळ मौजमजेसाठी स्कूटी चोरणाऱ्या चोराला काल मालाड पोलिसांनी अटक केली आहे. हा आरोपी स्कूटीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत ती स्कूटी चालवायचा आणि पेट्रोल संपल्यावर तो ती स्कूटी तिथेच सोडून दुसरी स्कूटी चोरून निघून जायचा. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी सूत्रांच्या मदतीनं या आरोपीला तात्काळ अटक केली आहे. गणेश जगदाळे असं या आरोपीचं नाव आहे. याच्याकडून तीन दुचाक्या पोलिसांनी जप्त  केल्यात. या चोराने आणखी किती स्कूटी चोरल्यात याचा शोध पोलीस घेत आहेत. 


 एका स्कूटी चोराला मुंबईतील मालाड पूर्व येथील कुरार पोलिसांनी अटक केली आहे. स्कूटीमध्ये पेट्रोल आहे तोपर्यंत ती चालवायची. पेट्रोल संपल्यावर तो स्कूटी तिथेच सोडून दुसरी स्कूटी चोरून निघून जाणाऱ्या आरोपीला अटक करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव गणेश जगदाळे (20) याला मालाड पूर्व येथील आंबेडकर नगर येथून अटक करण्यात आली आहे. जो मालाडचा रहिवासी आहे. आरोपींकडून तीन स्कूटी जप्त करण्यात आल्या आहेत.


कुरार पोलीस ठाण्याच्या हद्दीत महिनाभरात अनेक स्कूटी चोरीच्या घटना घडल्या आहेत. तपासात सूत्रांच्या मदतीने आरोपीची माहिती मिळाली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करून आरोपी गणेश जगदाळे (20) याला मालाड येथून अटक करण्यात आली. आरोपी थेट मास्टर कीने स्कूटीची चोरी करायचे. स्कूटीचे पेट्रोल जिथे संपायचे तीच स्कूटी सोडून तो दुसरी स्कूटी चोरायचा. त्याने आणखी किती स्कूटी चोरल्या आहेत, याचा तपास कुरार पोलीस करत आहेत.


बायकोच्या घराच्या स्वप्नासाठी 'तो' चोर बनला!


पुण्यातील कोंढवा भागातून महिनाभरापूर्वी अशीच एक धक्कादायक घटना समोर आली होती. पत्नीसाठी नवीन घर घेता यावं म्हणून पतीने तब्बल 37 लाख रुपयांच्या दागिन्यांची चोरी केली होती. दागिने चोरणाऱ्या चोर पतीला पोलिसांनी बेड्या ठोकल्या. मलाप्पा होसमानी (वय 31 वर्षे)  असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव आहे. पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखा युनिट पाचने या आरोपीला अटक केली. कोंढव्यात राहणाऱ्या बबिता डिसूजा यांच्या घरात ख्रिसमसच्या दिवशी चोरी झाली होती. या चोरीची तक्रार कोंढवा पोलिसांकडे दिली होती. ख्रिसमस असल्याने डिसूजा कुटुंबीय रात्री बाहेर गेले असताना आरोपीने घराच्या पाठीमागून येऊन खिडकीला लावलेले ग्रील तोडून आत प्रवेश केला. यावेळी त्याने घरातील सोने, चांदीच्या दागिन्यांबरोबर डायमंड, नेकलेस आणि महागडी घड्याळ देखील लंपास केली. डिसूजा कुटुंबीय घरी परतल्यानंतर हा सर्व प्रकार त्यांच्या लक्षात आला. घरात चोरी झाल्याचे लक्षात येताच डिसूजा कुटुंबीयांनी थेट पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. 


इतर महत्त्वाच्या बातम्या :