Mumbai Crime : मुंबईतील शिवडी भागात एक धक्कादायक घटना घडली आहे, एका 8 वर्षांच्या मुलीवर 65 वर्षीय शिक्षकाने बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपी हा 65 वर्षीचा वयोवृद्ध असून पेशाने अरबी शिक्षक आहे, शिवडी पोलिसांनी त्याला अटक केली आहे.


मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत वयोवृद्ध शिक्षकाकडून अत्याचार


पोलिसांच्या माहितीनुसार, पीडीत मुलगी आरोपीकडे अरेबिक भाषा शिकण्यासाठी गेली असता, आरोपीने हा गुन्हा केल्याचे पोलिसांनी सांगितले. मुलगी एकटी असल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर बलात्कार केला आणि वस्तुस्थिती उघड न करण्यासाठी तिला धमकावले. अत्याचार झाल्यानंतर मुलीने तिच्या आईकडे तिला होत असलेल्या असह्य वेदनांची तक्रार केली. त्यानंतर दोघींनी पोलिसात तक्रार दाखल केली. मोमरेज सरदार असे अटक आरोपीचे नाव असल्याचे पोलिसांनी सांगितले. त्याच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या संबंधित कलमांनुसार आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण अधिनियम, 2012 च्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


बलात्कार पीडितांमध्ये लहान मुलींची वाढती संख्या


मुंबईत शक्तीमिल येथील बलात्कार प्रकरण, कोपर्डी येथील अल्पवयीन मुलींवरील अत्याचार आण‌ि हत्या अशा घटनांनी मन सुन्न झाले असतानाच, मुंबईच्या शिवडी परिसरात आणखी एक धक्कादायक घटना घडली. सध्या बलात्कार पीडितांमध्ये लहान मुलींची वाढती संख्या हा चिंतेचा विषय आहे. अल्पवयीन बालकांवरच्या अत्याचारात जास्त वाढ होताना दिसत आहे. मुंबई शहरात अल्पवयीन मुलींवर अत्याचार होण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत चालले आहे. एखाद्या प्रकरणाची चर्चा होते. पण त्यानंतर गरीब मुलींवरील अत्याचारांची दखलही घेतली जात नाही, हे भयाण वास्तव आहे. 2012च्या निर्भया प्रकरणानंतर पोलीस आणि प्रसारमाध्यमांनी बलात्काराच्या प्रकरणांची गांभीर्याने दखल घ्यायला सुरुवात केली आहे. म्हणून बलात्काचाराच्या आकडेवारीत वाढ होण्यासाठी हेसुद्धा कारण आहे, त्यामुळे सरकारने याची गंभीर दखल घेण्याची गरज आहे.


त्यानंतर या धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला...


आरोपीने बलात्कार केल्यानंतर पीडीत मुलीला वस्तुस्थिती उघड न करण्यासाठी धमकावले जाते. अत्याचार झाल्यानंतर अनेक मुली समाजात बदनामी होईल भीतीपोटी याची वाच्यता कुठेही करत नाही. आणि अत्याचार निमूटपणे सहन करतात, या प्रकरणामध्ये या मुलीने मात्र तिला होत असलेल्या असह्य वेदनांची तक्रार आईकडे केली. त्यानंतर दोघींनी पोलिसात तक्रार दाखल केली. त्यानंतर या धक्कादायक गोष्टीचा खुलासा झाला. आणि आरोपीला अटक झाली. 


इतर महत्वाच्या बातम्या


मुंबई-गोवा महामार्गावरील कशेडी घाटात भीषण अपघात, तीन मुलींसह एकाचा मृत्यू