Raigad Accident News : राजयगड जिल्ह्यातील पोलादपूर तालुक्या जवळ मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात चोळई येथे भीषण अपघात झालाय. यात चार जणांचा मृत्यू झालाय आहे. रिक्षा आणि डंपरचा अपघात झालाय. खेड येथे परीक्षेसाठी गेलेले विद्यार्थी गोरेगावला परत येत असताना हा अपघात झालाय. मृतांमध्ये तीन मुली आणि रिक्षा चालकचा समावेश आहे. उमर बडुर, हलिमा पोतेरे (23 रा. नांदवी), असिया बडुर (20 रा. गोरेगाव) नाजनिन करबेलकर ( वय, 23 रा. टेमपाले ) अशी अपघाता मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.
मुंबई- गोवा महामार्गावरील कशेडी घाटात डंपर पलटी झाला. या डंबरमध्ये वाळू होती. डंपर पलटी झाल्यानंतर वाळूच्या ढिगाऱ्याखाली प्रवासी रिक्षा अडकली. रिक्षातील प्रवासी आणि चालक देखील वाळूच्या ढिगाऱ्याखाली अडकले. त्यामुळे चार जणांचा जागीच मृत्यू झाला. रिक्षातील एका व्यक्तीचा मृतदेह ढिगाऱ्याखालून काढण्यात आला असून वाळूचा ढिगारा बाजूला काढण्याचे काम सुरू आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही व्यक्ती असण्याची शक्यता स्थानिकांनी वर्तवली आहे.
आज संध्याकाळी सव्वा सात वाजण्याच्या दरम्यान पोलादपूर काशेडी घाटात हा अपघात झाला. वाळूने भरलेला डंपर पलटी झाला. त्या खाली एक रिक्षा दबली. या रिक्षामध्ये चालक आणि तीन प्रवासी मुली होत्या. रिक्षावर डंपरमधली संपूर्ण वाळू पडल्याचे रिक्षातील चारही जाणांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर महामार्गावरील वाहतून ठप्प झाली होती. परंतु, पोलिसंनी आणि स्थानिकांनी वाळू बाजूला करून काही वेळानंतर वाहतूक सुरळीत केली.
महत्वाच्या बातम्या