Mumbai Crime: पत्नीच्या कोल्डड्रिंकमध्ये गुंगीचं औषध मिळवून तिच्यावर सामूहिक बलात्कार (Gangrape) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. ही घटना मुंबईच्या (Mumbai) अंबोली पोलीस ठाण्याच्या (Amboli Police Station) हद्दीत शुक्रवारी घडलीय. पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, पोलिसांनी तिच्या पतीसह त्याच्या मित्राविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केलीय. याप्रकरणी पोलिसांनी पुढील चौकशीला सुरुवात केलीय. या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ माजली आहे.


मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी पतीनं वाढदिवसाची पार्टी साजरा करण्यासाठी जायचं आहे, असं सांगत तिला मित्राची घरी घेऊन गेला. तिथे गेल्यावर पीडित महिलेला कोल्डड्रिंक प्यायला दिलं. कोल्डड्रिंक प्यायल्यानंतर पीडित महिला बेशुद्ध झाली. पीडिताला काही तासानंतर शुद्ध आली. त्यावेळी पीडित महिलेच्या अंगावरील कपडे अस्तावस्त झाले होते. त्यावेळी तिच्या घडलेल्या संपूर्ण प्रकार पीडिताच्या लक्षात आला. यानंतर पीडितानं आपल्या पतीला जाब विचारला. त्यावेळी याबाबत कुठे वाच्यता केल्यास तिला ठार मारण्याची तिच्या पतीनं धमकी दिली.


त्यानंतर आपल्या घरी परतल्यानंतर पीडितानं तिच्या पतीसह भांडण केलं. तसेच तिच्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकार कुटुंबियांना सांगितला. त्यानंतर पीडिताच्या घरच्यांनी दुसऱ्या दिवशी शनिवारी अंबोली पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, पोलिसांनी पीडिताच्या पतीसह त्याच्या मित्राविरोधात भादंवि कलम 376 (2), 376 (ड), 506 (2) आणि 34 अन्वये गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केलीय. पोलिसांनी आरोपींना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.  


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha


हे देखील वाचा-