मुंबई : मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत घट पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 115 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 269 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,41,769 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.
मुंबईत गेल्या 24 तासात चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2059 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 2647 दिवसांवर गेला आहे. सील केलेल्या इमारतींची संख्या देखील कमी झाली आहे. मुंबईतील सध्या 19 इमारती सील करण्यात आल्या आहेत. सध्या मुंबईत एकही कंटेनमेंट झोन नाही.
राज्यात आज 536 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या (coronavirus) दैनंदिन रुग्णसंख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. राज्यात आज 536 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 853 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 64 लाख 82 हजार 493 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.07 टक्के आहे. राज्यात आज 21 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. राज्यात सध्या 7854 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. सध्या राज्यात 85 हजार 800 व्यक्ती होम क्वॉरंटाईनमध्ये आहेत तर 1028 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 6, 54 , 20, 117 प्रयोगशाळा तपासण्या करण्यात आल्या आहे.
गेल्या 24 तासांत आढळले 8,309 नवे रुग्ण
दक्षिण आफ्रिकेत आढळलेल्या ओमिक्रोन व्हेरिएंटनं जगभरात खळबळ माजवली आहे. ओमिक्रॉन व्हेरिएंटचा धोका ओळखून देशांमध्ये सतर्कतेचं वातावरण आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळजी घेण्याचं आवाहन केलेय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ओमिक्रॉन व्हेरिएंटबद्दल चिंता व्यक्त करत उपाययोजनाची चचपणी करण्याचा आदेश दिलाय. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, मागील 24 तासांत देशात 8 हजार 309 नव्या रुग्णांची भर पडली आहे. तर 9 हजार 905 जणांनी कोरोनावर मात केली आहे.