Sanjay Raut Daughter Marriage :  शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्या मुलीचा विवाह सोहळा आज, सोमवारी पार पडला. या लग्न सोहळ्याला अनेक मोठ्या राजकीय नेत्यांनी उपस्थिती दर्शवत नवविवाहित दाम्पत्यास आशीर्वाद दिला. सोशल मीडियावर संजय राऊत यांच्या मुलीच्या विवाहाची चांगलीच चर्चा सुरू होती. आता, या विवाह सोहळ्याची निमंत्रण पत्रिका चर्चेत आली आहे. ही लग्नाची पत्रिका व्हायरल होत आहे. ही लग्नपत्रिका 'पीएम' च्या लग्नाचे आमंत्रण देत होती.  #PMkishadi असा हॅशटॅग या पत्रिकेवर होता. 


संजय राऊत यांची कन्या पूर्वशी राऊत हिचा विवाह ठाण्याचे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर यांचे चिरंजीव मल्हार यांच्यासोबत सोमवारी पार पडला. या विवाहाच्या आधी संगीत कार्यक्रमातील व्हिडिओ व्हायरल झाला होता. संजय राऊत आणि सुप्रिया सुळे यांनी एका गाण्यावर ठेका धरला होता. या व्हिडिओची जोरदार चर्चा झाली. त्यानंतर लग्नपत्रिका व्हायरल झाली आहे. या लग्नपत्रिकेत 'पीएम'च्या विवाह सोहळ्याचे आमंत्रण देण्यात आले होते. लग्नपत्रिकेत #PMkiShadi असा हॅशटॅग वापरण्यात आला. 




'पीएमकीशादी' चर्चेत!


लग्नपत्रिकेत पूर्वशी आणि मल्हार यांचे नाव इंग्रजीत आहे. या दोघांच्या नावातील आद्यक्षर घेऊन हॅशटॅग करण्यात आला. त्यातून पूर्वशीचा P आणि मल्हारचा M अशी अक्षरे मिळून #PMkiShaadi असा हॅशटॅग करण्यात आला. अशा प्रकारे नावाच्या आद्य अक्षरांनी हॅशटॅग करणे हे मागील काही वर्षांपासून ट्रेंड सुरू झाला आहे. त्यातून काही तयार झालेले काही हॅशटॅग चर्चेत येत असतात.  


पाहा व्हिडिओ: राऊत यांच्या कन्येचा विवाहसोहळा, नव दाम्पत्याला शरद पवारांनी दिला आशिर्वाद


 



इतर महत्त्वाच्या बातम्या:


PHOTO : संजय राऊतांच्या कन्येचा शाही विवाह, शरद पवार, राज ठाकरेंसह दिग्गजांची उपस्थिती, पाहा फोटो


Omicron variant : ओमिक्रॉनसंदर्भात मंत्रिमंडळाने व्यक्त केली चिंता, मुख्यमंत्री म्हणाले, ...तर संसर्गाला रोखणे सोपे