Mumbai, मिरा रोड : मुंबई (Mumbai) अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरील घोडबंदर येथील वर्सोवा खाडी पुलावरून एका दाम्पत्याने उडी मारल्याची धक्कादायक घटना गुरुवारी (दि.29) सकाळी 10 वाजता घडली आहे. स्थानिक पोलिसांनी (Police) दिलेल्या माहितीनुसार, या घटनेत पतीला वाचवण्यात यश आले आहे, तर पत्नीचा शोध अद्याप सुरू आहे.
पत्नीला वाचवण्यासाठी पतीचीही वर्सोवा खाडीत उडी
शशिकला दिनेश यादव (वय 28) आणि दिनेश यादव (वय 32) हे दाम्पत्य नायगावचे रहिवासी आहे. यादव दाम्पत्य गुरुवारी सकाळी अहमदाबादकडून मुंबईकडे येणाऱ्या वर्सोवा पुलावर पोहोचले. अचानक शशिकलाने वर्सोवा खाडीमध्ये उडी घेतली. त्यानंतर तिच्या पतीनेही (दिनेश यादव) तिला वाचवण्यासाठी तात्काळ पाण्यात उडी घेतली.
घटनेची माहिती मिळताच मार्गावरील वाहनचालकांनी त्वरित स्थानिक पोलिसांना कळवले. मिरा-भायंदर अग्निशामक दल आणि काशिगाव पोलिस स्टेशनचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशामक विभागाने जलद बोटींच्या मदतीने दिनेश यादवला वाचवले. परंतु ससिकला पाण्याच्या प्रवाहात वाहून गेल्यामुळे तिचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे.
घटनेच्या मागे कौटुंबिक वाद असल्याचा संशय
काशिगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राहुल पाटील यांनी सांगितले की, शशिकलाच्या शोधासाठी शोधकार्य सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या घटनेच्या मागे कौटुंबिक वाद असल्याचा संशय आहे, सध्या पोलिस घटनेची चौकशी करत आहेत.
पुण्यातील इंद्रायणी नदीत 4 दिवसांत 2 महिलांनी उडी घेत टोकाचा निर्णय
पुण्यातील इंद्रायणी नदीत उडी मारत काही दिवसांपूर्वी एका पोलीस असलेल्या महिलेने जीवन संपवले होते. त्यानंतर 3 दिवसांनी आणखी एका महिलेने इंद्रायणी नदीत उडी घेऊन जीवन संपवले आहेत. पोलीस महिलेने नदीच्या पुलावर जात मित्राला फोन करत मी आत्महत्या करत असल्याची सांगत उडी घेतली होती. तर आज पीएमपीएमएल बस स्टॉप लगतच्या पुलावरून महिलेने जीव देण्याच्या उद्देशाने उडी घेतलेली आहे. दरम्यान, या महिलेचा अजूनही शोध सुरु आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Bhiwandi Crime : पिसाळलेल्या भटक्या कुत्र्यांनी चिमुकलीचं आयुष्य संपवलं; हल्ल्यात जखमी चिमुरडीचा दुर्दैवी अंत