Mumbai Coronavirus cases : मुंबईकरांसाठी पॉझिटिव्ह (Mumbai Corona Update)  बातमी समोर आली आहे.  तब्बल  चार  महिन्यानंतर शहरात शून्य कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. या वर्षात पाच वेळा शून्य कोरोनाबाधित रुग्णाांची नोंद झाली. 13 फेब्रुवारी 2023 नंतर पहिल्यांदाच मुंबईमध्ये एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. तसेच मुंबईत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या देखील शून्य आहे त्यामुळे मुंबईसाठी ही पॉझिटिव्ह बातमी आहे.

  


मुंबईत किती सक्रिय रुग्ण?


मुंबईमध्ये आज एकाही कोरोना रुग्णाची नोंद झाली नाही. ही दिलासादायक बातमी आहे. पण मुंबईत सध्या 36 सक्रिय रुग्ण आहेत. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत 1163913 इतक्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1144104 जणांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 19773 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे. 


 






मुंबईचा रिकव्हरी रेट 98.3 टक्के


मुंबईचा रिकव्हरी रेट 98.3 टक्के इतका झाला आहे. तर मागील 24 तासांत शून्य रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे मृत्यू पावलेल्यांची संख्या 19,773 झाली आहे. सध्या मुंबईत 1,711 रुग्ण आहेत.रुग्ण दुपटीचा दर आणि सक्रिय रुग्णसंख्यादेखील वेगाने वाढत आहे. रुग्ण दुपटीचा दर 140981 दिवसांवर गेला आहे.


मुंबई पालिकेला यश 


मार्च 2020 मध्ये मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाला आणि त्यानंतर कोरोना बाधित रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ होत गेली. मुंबईत कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर बाधित रुग्ण संख्या 21 हजारांच्या घरात पोहोचली होती, तर कोरोनामुळे रोज मृत्यू होण्याची संख्या 100 च्या घरात पोहोचली होती. मात्र राज्य सरकार व मुंबई महापालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत धडकलेल्या कोरोनाच्या तिन्ही लाटा परतवण्यात पालिका यश आले. दरम्यान, मुंबईत आतापर्यंत कोरोनाच्या तीन लाटा उसळल्या असून ओमायक्राॅन बीएफ 7, एक्सबीबी, एक्सबीबी 1.5 असे नवनवीन व्हेरिएंटचा शिरकाव मुंबईत झाला. मात्र पालिकेने राबवलेल्या विविध उपाययोजनांमुळे मुंबईत कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात यश आले आहे.   


मुंबई महनगरपालिकेतर्फे ज्येष्ठ नागरिकांना विनामूल्य लस देण्यात येणार आहे. मुंबई पालिकेच्या 24 वॉर्डांमधील निवडक केंद्रांवर  भारत बायोटेकची   इन्कोव्हॅक (iNCOVACC BBV154)  नाकावाटे दिली जाणारी लस उपलब्ध  असणार आहे. मुंबई महानगरपालिकेतर्फे या केंद्रांची यादी जारी करण्यात आली आहे.  24 वॉर्डांमध्ये प्रत्येकी एक लसीकरण केंद्र असेल. नोंदणी  जागेवरच होईल आणि लसीकरण केंद्रे सकाळी 9 ते दुपारी 3 या वेळेत सुरू राहतील.   इन्कोव्हॅक ही नाकातून (सुईशिवाय) दिली जाणारी जगातील पहिली कोविड लस आहे. इंग्रजीमध्ये या लशीला Intra-Nasal Covid Vaccine असं म्हटलं जाते.