Mumbai University: मुंबईतील नामांकित महाविद्यालयांची पदवीच्या पहिल्या वर्षासाठी गुणवत्ता यादी जाहीर झाली असून अनेक महाविद्यालयात 90 टक्क्यांहून अधिक कटऑफ लागल्याचं दिसून येतंय. एफवायच्या प्रवेशाची पहिली नामाकिंत महाविद्यालयातील पहिली गुणवत्ता यादी यंदा नव्वदीपारच असून गेल्यावर्षीच्या तुलनेत कुठे एक ते दोन टक्यांनी वाढ तर काही महाविद्यालयाचा कटऑफ घसरला असल्याचं दिसून आलं आहे.  


नामवंत महाविद्यालयातील कटऑफ नव्वदहून अधिक दिसून आले आहेत. मुंबई विद्यापीठाशी सलंग्नित महाविद्यालये आणि मान्यताप्राप्त शिक्षणसंस्थामध्ये पदवीच्या प्रथम वर्ष प्रवेशासाठीची पहिली गुणवत्ता यादी सोमवारी जाहीर झाली. यंदा दोन लाख 33 हजार 563 विद्यार्थ्यांनी अर्ज नोंदणी केली होती. सेल्फ फायनान्स अभ्यासक्रमांबरोबर कला आणि वाणिज्य शाखेच्या कटऑफमध्ये यंदा वाढ झाली आहे. 


यंदा केंद्रीय बोर्डाच्या विद्यार्थ्यांना नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्या अधिक होती. बारावीला राज्य मंडळाची नव्वदी पार केलेल्या विद्यार्थ्यांची संख्याही कमी होती. त्याचा काही ठिकाणी परिणाम कटऑफवर झाल्याचेही महाविद्यालयाकडून सांगण्यता येतंय. 


पहिल्या यादीत ज्या विद्यार्थ्यांना प्रवेश मिळणार आहेत त्या विद्यार्थ्यांनी 20 ते 27 जून दरम्यान महाविद्यालयात प्रत्यक्ष जावून प्रवेश घ्यावे लागणार आहेत.


मुंबईतील नामांकित कॉलेजचे कट ऑफ


एच आर कॉलेज


BCom: 96%
BMM: Commerce: 91, Arts: 90.5, Science: 89 
BMS: Commerce: 96, Arts: 92.6, Science: 92.33


केसी कॉलेज 


BA: 87.5%
BSc: 90.2%
BCom: 95%
BAMMC: Commerce: 95.33, Arts: 93.33, Science: 90.8
BMS: Commerce: 96, Arts: 91.60, Science: 91.60


रुईया महाविद्यालय


BA: 93%
BSc: 63%
BAMMC: 93.5%


झेवीयर्स महाविद्यालय


BA: 92.17% 
BSc: 72%


हिंदुजा कॉलेज


BCom: 74.33%
BAF: 86.5%
BMS: Commerce: 88.17%, Arts: 70%, Science: 74%
BAMMC: Commerce: 82%, Arts: 70.33%, Science: 50.83%
BSc IT: 82% (math marks)


ही बातमी वाचा: 



 


 


Education Loan Information:

Calculate Education Loan EMI