मुंबई : सध्या देशासह राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत आहे. अशातच रुग्ण संख्या वाढत असताना एक समाधानकारक बाब समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार चाळी आणि झोपडपट्ट्यांमधून कमी झाल्याने त्या कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत. मुंबईत सध्या फक्त 13 झोडपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत. मुंबईमधील इतर सर्व झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत.


गेल्या 11 महिन्यात 2742 चाळी आणि झोपडपट्ट्या कन्टेन्मेंट झोन मुक्त झाल्या आहेत. मुंबईमधील 60 टक्के नागरिक झोपडपट्ट्या आणि चाळींमध्ये राहतात. या झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्याने झोपड्पट्टीवासीयांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईमध्ये गेले अकरा महिने करण्यात आलेल्या उपाययोजनांमुळे कोरोनाचा प्रसार कमी झाला होता. मात्र फेब्रुवारीत पुन्हा रुग्ण संख्या वाढू लागली आहे. रुग्ण संख्या वाढत असल्याने मुंबई लॉकडाऊनच्या दिशेने जात असताना एक समाधानकारक बाब समोर आली आहे. कोरोनाचा प्रसार चाळी आणि झोपडपट्ट्यामधून कमी झाल्याने त्या कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत. मुंबईत सध्या फक्त 13 झोडपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट झोनमध्ये आहेत. मुंबईमधील इतर सर्व झोपडपट्ट्या आणि चाळी कन्टेन्मेंट मुक्त झाल्या आहेत.




  • मुंबईमधील भांडुप एस विभागात 9

  • कुर्ला एल विभागात 2

  • खार एच. इस्ट 1

  • परेल एफ. साऊथ 1


असे फक्त 13 कन्टेन्मेंट झोन झोपडपट्टी आणि चाळीमध्ये आहेत. मुंबईत इतर ठिकाणी कोणत्याही चाळी आणि झोपड्या कन्टेन्मेंट झोनमध्ये नसल्यानं मुंबईमधील चाळी आणि झोपडपट्ट्यातून कोरोना हद्दपार झालेला आहे. मुंबईमधून गेल्या मार्चपासून आतापर्यंत गेल्या 11 महिन्यात 2742 चाळी आणि झोपडपट्ट्या कन्टेन्मेंट झोन मुक्त झाल्या आहेत.


मुंबईत 126 इमारती सील :


मुंबईत 126 इमारती आणि त्यामधील मजले सील केल्याने कन्टेन्मेंट झोन आहेत. त्यात सर्वाधिक सील इमारती मुलुंड टी विभागात असून मुलुंड टी विभागातील 18 इमारती सील केलेल्या आहेत. मुंबईत आतापर्यंत एकूण 64 हजार 923 इमारती सील केल्या होत्या, त्या सर्व कंटेन्टमेंट मुक्त झाल्या आहेत.




  • भांडुप एस विभागात 17,

  • वांद्रे एच वेस्ट विभागात 16,

  • गोरेगांव पी साऊथ विभागात 11,

  • परेल एफ साऊथ विभागात 11,

  • चेंबूर एम वेस्ट विभागात 10,

  • खार एच इस्ट विभागात 6,

  • अंधेरी पूर्व के वेस्ट आणि ग्रांट रोड डी विभागात प्रत्येकी 5,

  • दहिसर आर नॉर्थ, मालाड पी नॉर्थ,

  • घाटकोपर एन, माटुंगा एफ नॉर्थ या विभागात प्रत्येकी 4

  • बोरिवली आर सेंट्रल, गोवंडी मानखुर्द एम इस्ट, एल्फिस्टन जी साऊथ, दादर जी नॉर्थ, मरिन लाईन्स सी विभागात प्रत्येकी 2,

  • बोरिवली आर सेंट्रल विभागात 1 तर कुर्ला एल, खार के इस्ट, भायखळा ई, सँडहर्स्ट रोड बी आणि फोर्ट कुलाबा ए विभागात एकही इमारत सील नाही.


महत्त्वाच्या इतर बातम्या :