Mumbai Corona Update : मुंबईतील दैनंदिन कोरोना रुग्णांच्या संख्येत चढउतार पाहायला मिळत आहे. बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, बुधवारी मुंबईत 124 नव्या रुग्णांची भर पडली आहे. बुधवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. बुधवारी 117 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.


बीएमसीने दिलेल्या आकडेवारीनुसार, मुंबईत बुधवारी एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. तर गेल्या 24 तासात मुंबईमध्ये 117 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईमध्ये सध्या 851 सक्रीय रुग्ण आहेत. मुंबईमध्ये आतापर्यंत 10,40,624 रुग्ण कोरोनामुक्त झाले असून बरे झालेल्या रुग्णांचे प्रमाण हे 98 टक्के इतकं आहे. तसेच मुंबईतील रुग्ण दुप्पटीचा कालावधी कालावधी 6161 झाला आहे. तसेच कोरोना वाढीचा दर 0.010% टक्के इतका आहे.





सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईत 


राज्यात सर्वाधिक सक्रीय रुग्ण मुंबईममध्ये आहेत. मुंबईमध्ये 851 सक्रीय रुग्ण आहेत. तर पुण्यात 284 सक्रीय रुग्ण आहेत. त्यानंतर ठाण्यात 158 सक्रीय रुग्ण आहेत. अहमदनगर 23, रायगड 23 सक्रीय रुग्ण आहेत. इतर ठिकाणी सक्रीय रुग्णांची संख्या 10 पेक्षा कमी आहे. राज्यात एकूण 1412 सक्रिय रुग्ण आहेत.


राज्यात आज 221 रुग्णांची नोंद


देशात कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढत असताना राज्यातील संख्या मात्र काहीशी स्थिर असल्याचं चित्र आहे. राज्यात आज 221 नव्या रुग्णांची भर पडली असून एका कोरोना बाधिताचा मृत्यू झाला आहे. गेल्या 24 तासामध्ये राज्यात 211 रुग्ण हे कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.


संबंधित बातम्या


Maharashtra Corona Update : राज्यात आज 221 रुग्णांची भर, तर 211 रुग्ण कोरोनामुक्त


Mask : रेल्वेचा प्रवास करताना मास्क वापरा, मात्र त्याची सक्ती नाही; वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता रेल्वेची प्रवाशांना सूचना


Corona Cases : देशात कोरोनाच्या अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 19 हजार पार, तर 54 रुग्णांचा मृत्यू