Coronavirus New Cases : देशात गेल्या 24 तासांत कोरोना (Covid-19) व्हायरसच्या 2 हजार 897 रुग्णांची नोंद झाली आहे. तर 54 लोकांचा मृत्यू झाला आहे. यामुळे कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या (Coronavirus Active Patients) वाढली असून 19 हजार 494 वर पोहोचली आहे. तर कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट (Corona Positivity Rate) 0.61 टक्क्यांवर पोहोचला आहे. दरम्यान, काल (मंगळवारी) देशात कोरोनाच्या 2,288 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली होती. तसेच, कोरोना प्रतिबंधक राष्ट्रीय लसीकरण मोहीमेत (Corona Vaccination) आतापर्यंत कोरोनाच्या 190.50 कोटींहून अधिक लसीचे डोस देण्यात आले आहेत.
दरम्यान, देशात सात ऑगस्ट 2020 रोजी कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या 20 लाख, 23 ऑगस्ट 2020 रोजी 30 लाख आणि पाच सप्टेंबर रोजी 40 लाखांहून अधिक होती. कोरोनाबाधितांची एकूण संख्या 16 सप्टेंबर 2020 रोजी 50 लाख, 28 डिसेंबर रोजी 60 लाख, 11 ऑक्टोबर 2020 रोजी 70 लाख, 29 ऑक्टोबर रोजी 80 लाख आणि 20 नोव्हेंबर रोजी 90 लाखांच्या पार पोहोचली होती. त्यानंतर देशात 19 सप्टेंबर रोजी कोरोनाबाधितांची संख्या एक कोटींवर पोहोचली होती. गेल्या वर्षी 4 मे रोजी कोरोनाबाधितांची संख्या दोन कोटींवर पोहोचली होती. एवढंच नाहीतर 23 जून रोजी कोरोनाबाधितांच्या एकूण संख्येनं तब्बल तीन कोटींचा टप्पा पार केला होता. त्यानंतर 26 जानेवारी रोजी हा आकडा 4 कोटींवर पोहोचला आहे.
दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1118 नवीन रुग्ण
भारताची राजधानी दिल्लीमध्ये गेल्या 24 तासात कोरोनाच्या 1,118 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आहे. तर एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. दिल्लीत एक दिवस आधी कोविड-19 साठी 25,528 नमुने तपासण्यात आले होते. त्यानुसार, दिल्लीत आतापर्यंत एकूण 18,96,171 कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे आतापर्यंत दिल्लीत एकूण 26,183 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर यापूर्वी सोमवारी दिल्लीत 799 रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
मुंबईत 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत 35 टक्क्यांची वाढ
दिल्लीपाठोपाठ आता देशाची आर्थिक राजधानी असणाऱ्या मुंबईतही हळूहळू कोरोनाबाधितांची संख्या वाढत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 10 दिवसांत मुंबईत सक्रिय रुग्णांच्या संख्येत जवळपास 35 टक्क्यांनी वाढ झाली आहे. मंगळवारी मुंबईत 122 नव्या रुग्णांची भर पडली आहे. मंगळवारी दोन रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मागील 24 तासांत मुंबईत एकाही कोरोनाबाधित रुग्णाचा मृत्यू झाला नाही. मंगळवारी 100 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.
राज्यात मंगळवारी 223 नव्या कोरोनाबाधितांची नोंद
महाराष्ट्रात मंगळवारी 223 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 161 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 98.11 टक्क्यांवर पोहोचलं आहे. राज्यात काल (मंगळवारी) दोन कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. त्यामळे राज्यातील कोरोना रुग्णसंख्येचा मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका झाला आहे. राज्यात आतापर्यंत एकूण 77,30,370 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच आतापर्यंत राज्यात एकूण 8,04,22,318 कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Mumbai Covid-19 News : मुंबईकरांनो सावध व्हा! 10 दिवसांत कोरोना रुग्णसंख्येत 35 टक्क्यांची वाढ