Mumbai Coronavirus: कोरोना पुन्हा एकदा (Coronavirus Mumbai) डोकं वर काढू पाहतंय, त्या पार्श्वभूमीवर मुंबई महानगपालिकेने (BMC) तयारी सुरू केली आहे. मुंबई महानगरपालिकेच्या (BMC Hospitals) सर्व रुग्णालयात मास्क अनिवार्य करण्यात आले आहे. तसेच मुंबई महानगरपालिकेच्या सर्व कार्यालयात आणि महानगरपालिकेच्या सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती (Mask Compulsory) करण्यात आली आहे.
मुंबई मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. कोरोनाच्या वाढत्या प्रभावानंतर मुंबई महापालिका प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने मास्क सक्ती करण्याच्यादृष्टीने पावले टाकण्यास सुरुवात केली आहे. मुंबई महापालिकेने आपल्या सर्व रुग्णालयात मास्क वापरण्यास सक्तीचे केले आहे. त्याशिवाय, मुंबई महापालिकेचे कार्यालय, सर्व कर्मचाऱ्यांना मास्क सक्ती करण्यात आली आहे. त्याशिवाय, वय 65 वर्षांवरील अधिक वयाच्या व्यक्तींना मास्क वापरण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मुंबईत मागील काही दिवसांपासून कोरोनाबाधितांची संख्या वाढू लागली आहे. त्या पार्श्वभूमीवर आज, महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी बैठक बोलावली होती. त्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला.
केरळ, महाराष्ट्र, दिल्ली आणि गुजरात सारख्या इतर राज्यांमध्ये कोरोनाच्या आकडेवारीत वेगाने वाढ होत आहे. केरळमध्ये गेल्या 24 तासांत कोरोनाची 1 हजार 799 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहेत. महाराष्ट्रात 788 तर राष्ट्रीय राजधानी दिल्लीत 755 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे
देशात कोरोना (Coronavirus) प्रादुर्भावाचा वेग अद्याप कमी झालेला नाही. गेल्या 24 तासांत देशात कोरोना व्हायरसच्या 5 हजार 880 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, नव्या रुग्णांमध्ये वाढ झाल्यामुळे सक्रिय रुग्णांची संख्या 35 हजार 199 वर पोहोचली आहे. तर गेल्या 24 तासांत एकूण 14 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालेला आहे. दिवसागणिक देशातील नव्या कोरोनाबाधितांच्या (Covid-19) आकड्यातही वाढ होत असल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोनाशी लढण्यासाठी मॉकड्रील
कोरोनाच्या (Coronavirus Updates) तयारीचा आढावा घेण्यासाठी आजपासून देशभरात मॉकड्रील (Mock Drill) केले जाणार आहे. ज्यात शासकीय आणि खासगी रुग्णालयातील विविध गोष्टींच्या तयारीची चाचणी होणार आहे. रुग्णालयातील आयसीयू बेड्स, ऑक्सिजन सिलेंडर, मास्क, औषधं, मुबलक कर्मचारी संख्या आणि विविध सामाग्री रुग्णालयात आहे की नाही? याची खात्री केली जाणार आहे.