मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचं बनावट फेसबुक अकाऊंट, विविध पक्षांच्या प्रचार रॅलीचे फोटोही पोस्ट
'कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ मुंबई सिटी' या नावाने कुणी अनोळखी व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट चालवलं जात आहे.

मुंबई : निवडणुकीदरम्यान फेक बातम्यांना वेसण घालण्याठी शासकीय यंत्रणा योग्य ती खबरदारी घेत आहेत. जिल्हा निवडणूक अधिकारी हे माध्यम कक्षाद्वारे फेक बातम्या, फेक पोस्ट, फेक फेसबुक, ट्विटर अकाऊंट यावर लक्ष ठेवून आहेत. मात्र मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचेच बनावट फेसबुक अकाउंट असल्याचं समोर आलं आहे.
निवडणुकी दरम्यान जिल्हा निवडणूक अधिकारी हे माध्यम कक्षाद्वारे फेक बातम्या, फेक पोस्ट, फेक फेसबुक , ट्विटर अकाउंट यावर लक्ष ठेवून असताना चक्क मुंबई जिल्हाधिकारी कार्यालयाचा फेसबुकवर बनावट अकाउंट असल्याचा समोर आलं आहे.
'कलेक्टर अँड डिस्ट्रिक्ट मॅजिस्ट्रेट ऑफ मुंबई सिटी' या नावाने कुणी अनोळखी व्यक्तीकडून हे फेसबुक अकाउंट चालवलं जात आहे. निवडणूक आयोगाच्या माध्यम कक्षाच्या निदर्शनास ही बाब आली आहे. त्यानंतर तात्काळ त्यांनी सायबर क्राईम सेलला याबाबत सूचना दिल्या आहेत.
विशेष म्हणजे मुंबई जिल्हाधिकारी कार्यालय यांच्या बनावट फेसबुक अकाऊंटवर विविध पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचार रॅलीचे फोटो पोस्ट करण्यात आले आहेत. त्यामुळे हे अकॉऊंट तात्काळ बंद करण्याच्या सूचना मुंबई जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी पोलीस आयुकांना दिल्या आहेत.
Before You Go
Vishakha Raut BMC : नगरसेवक पद धोक्यात, कुणबी प्रमाणपत्र रद्द; विखाशा राऊत काय म्हणाल्या? | ABP Majha Marathi News





















